
उन्हाळाभर ठेकेदारांनी काढल्या झोपा…. रस्ता पॅचवर्क चे काम केलेच नाही….
शहरात मुख्य रस्त्याच्या चिखलात फसत आहेत अनेक वाहने….
बहुजन समाज पार्टीच्या प्रा. डी. एन. खरे यांनी तक्रार करून सुद्धा महापालिकेने घेतले झोपेचे सोंग.
संबंधित अधिकारी व अभियंता यांच्या विरोधात आयुक्तांनी कारवाई न केल्यास लोक आयुक्तांकडे करणार तक्रार. प्रा. डी. एन. खरे



विरार दि. ०६/०७/२०२४, वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात गॅस वाहिन्या भूमिगत अंथरणेसाठी रस्ते खोदाई काम मे. गुजरात गॅस लि. यांनी केले असून खुदाई काम करण्यात आलेल्या रस्त्याचे पॅचवर्क चे काम करारनाम्यातील अटी- शर्ती नुसार वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने करावयाचे होते. संबंधित विभागाचे अभियंता यांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी पॅचवर्क व डांबरीकरणाचे काम करून घेण्यात न आल्याने संबंधित ठेकेदार यांच्यावर नियमा नुसार १५ दिवसात तात्काळ कडक कार्यवाही करून लायसन्स काळ्या यादीत टाकावे. अन्यथा संबंधित अधिकारी यांच्या विरोधात मा. लोकायुक्त यांच्याकडे तक्रार दाखल करणार असल्याचे बहुजन समाज पार्टी चे पालघर जिल्हा प्रभारी प्रा. डी. एन. खरे यांनी सांगितले.
मे. गुजरात गॅस लि. यांनी “वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात गॅस वाहिन्या भूमिगत अंथरणेसाठी रस्ते खोदाई काम करणे” या कामात अनेक प्रकारच्या गंभीर स्वरूपाच्या अनियमितता केलेल्या असल्याचे आढळून येत आहेत. आयुक्त, श्री. अनिलकुमार पवार यांनी दि. १२/०४/२०२३ च्या मंजूर टिपणी नुसार दि. १५/०५/२०२३ रोजी पर्यंत कामे करण्यास मुदतवाढ परवानगी दिली असतांना, परत दि. ३१/१२/२०२३ रोजी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्या नंतर दि. ०७/०२/२०२४ च्या पत्रा नुसार दि. ३१ मार्च, २०२४ पर्यंत परत मुदतवाढ देण्यात आली. दि. ३०/०१/२०२४ रोजीच्या पत्रानुसार पुन्हा दि. १५/०५/२०२४ रोजी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तरी सुद्धा मे. गुजरात गॅस ली. यांनी मुदतीत काम न केल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन विनाकारण लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी प्रा. डी. एन. खरे यांनी केली आहे.
मे. गुजरात गॅस प्रा. लि. द्वारे वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात सुमारे २३० कि. मी. लांबीची गॅस पाईप लाईन रस्ता खोदकाम करून अंथरल्या जात आहे. परंतु महापालिकेच्या कंत्राटदाराने करारनाम्यातील अति-शर्ती नुसार रस्ते पुनर्भरण व समतल करून रस्ता दुरुस्तीचे व पॅचवर्क चे काम पूर्ण केलेले नाही. किंवा संबंधित प्रभाग समितीच्या उप अभियंता यांनी ते तात्काळ करून घेतलेले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी अपघात होत असून विरार पूर्व चंदनसार येथे मोठा अपघात पुण्यापासून थोडक्यात टळले अन्यथा मोठी जीवित व आर्थिक हानी होणार होती. रस्ता खोदकाम केलेल्या अनेक ठिकाणी वाहने चिखलात फसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे प्रा. डी. एन. खरे यांनी सांगितले.
तसेच प्रभाग समिती “डी” कार्यक्षेत्रातील मौजे- आचोळे येथे स्मशानभूमी समोरील रस्ता खोदण्यापूर्वी मे. गुजरात गॅस प्रा. लि. यांनी कोणाचीही पूर्व परवानगी घेतली नसल्याचे आढळून येते. त्यामुळे रस्त्याची दुर्दशा झाली असून नागरिकांना सदरच्या रस्त्यावरून वाहतूक करणे त्रासाचे झाले होते.
तसेच पहिल्या टप्यातील रस्ते पुनर्भरणाची कामे झाल्या नंतर त्याचे फोटो सादर करावे व तद्नंतरच पुढील टप्प्याची रस्ता खोदाई परवानगी देण्यात येईल या अटींची मे. गुजरात गॅस प्रा. लि. व महापालिकेच्या संबंधित अभियंता मिळून करारनाम्यातील अटी व शर्तींचा भंग केले असल्याचा आरोप प्रा. डी. एन. खरे यांनी केला.
नियमानुसार गुजरात गॅस प्रा . ली. मार्फत खोदाई करण्यात आलेल्या रस्त्याचे पॅचवर्क काम करण्यासाठी महानगरपालिके मार्फत कंत्राट काढण्यात येईल व नियुक्त केलेल्या कंत्राटदाराकडून सदरची कामे मनपा मार्फत करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे. व त्यासाठी लागणारी रक्कम गुजरात गॅस यांनी महापालिकेकडे भरणा केलेली आहे. असे असतांना महापालिके द्वारे नियुक्त केलेल्या ठेकेदाराकडून अद्याप पर्यंत रस्ते पॅचवर्क चे काम सुरु न केल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून वाहतूक करणे त्रासाचे झालेले आहे. तसेच पावसाळा सुरू झाल्याने सध्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या पॅचवर्क चे काम करता येणार नसल्याने वसई-विरार शहर च्या नागरिकांना चिखल व अपघाताचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर तात्काळ योग्य ती कार्यवाही करून त्यांचे लायसन्स काळ्या यादीत टाकावे. अशी मागणी बहुजन समाज पक्षा द्वारे करण्यात येत आहे. अन्यथा संबंधित अधिकारी यांच्या विरोधात मा. लोकायुक्त यांच्याकडे तक्रार दाखल करणार आहोत असे प्रा. डी. एन. खरे यांनी सांगितले.