
…



दापोली (प्रतिनिधी)- कै.वैष्णवी मागासवर्गीय सेवाभावी संस्थचे संस्थापक अध्यक्ष आयु. मोहन दादा जाधव यांच्या सहकार्या ने जामगे पंचक्रोशी तील सर्व जिल्हा परिषद मराठी शाळा जामगे सातेरे शिरसाडी विसापूर खातलोली पात्रिकोंड बेंद्रेवाडी देवाचा डोंगर आणि नवभारत हायस्कूल जामगे ह्या सर्व शाळेच्या विद्यार्थांना तसेच इतर शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप शुक्रवार दिनांक 5 जुलै रोजी सकाळी ठीक 10 वाजता जामगे गावचे सामाजिक कार्यकर्ते संस्थेचे सदस्य बुद्धिवान मारुती जाधव आणि सामजिक कार्यकर्ते संस्थेचे सदस्य नितेश कृष्णदास जाधव ह्यांच्या पुढाकाराने या कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष स्कूल कमिटी चे अध्यक्ष श्री. शिवाजी दादा कदम ह्यांच्या अध्यक्षतेखाली हा पूर्ण कार्यक्रम संपन्न झाला ह्या कार्यक्रम साठी प्रमुख उपस्थिती सन्मानिय सुशिलजी पुपालाजी साहेब सन्मानीय ऍड.जॅकीजी जैन साहेब सन्मानीय ऍड.गौरवजी साळगावकर साहेब सन्मानीय विघ्नेशजी मारीचा साहेब सर्व आणि पंचक्रोशीतील सर्व सरपंच उपसरपंच पोलीस पाटील तंटामुक्त अध्यक्ष पंचक्रोशीतील सर्व प्रमुख पदाधिकारी प्रतिष्ठित मान्यवर तसेच सर्व विद्यार्थ्यांचे पालक विद्यार्थी आणि सर्व मराठी शाळा चे शिक्षक व नवभारत हायस्कूल जामगे चे सर्व शिक्षक उपस्थित होते तसेच जामगे गावचे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र मोरे /अमित जाधव /महेंद्र जाधव /प्रमोद जाधव / अतीष जाधव उपस्थित होते सर्वांच्या उपस्थितीत शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप करण्यात आले तसेच सर्व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक पालक आणि पंचक्रोशीतील सर्व मान्यवर ह्याच्या उपस्थित हा सर्व कार्यक्रम संपन्न झाला ह्या कार्यक्रम साठी नवभारत हायस्कूल जामगे चे सर्व शिक्षक यांनी योग्य सहकार्य करून कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन करून सर्व कार्यक्रम साठी सर्व शिक्षक यांनी सहकार्य केलं उपस्थित सर्वाचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहन दादा जाधव यांनी आणि संस्थेचे सदस्य बुद्धिवान जाधव आणि नितेश जाधव यांनी सर्वाचे आभार मानले.