धमकी देणाऱ्या अर्षद चौधरीला पहाटे 7 वाजता राहत्या घरातून अटक

पेल्हार पोलीस ठाण्यात कलम 127 (2), 129, 135,, 138, 115 (2), 118 (1), 351 (2), 352, 140 (3) अंतर्गत गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी, वसई
वसई-विरारमधील शासकीय कार्यालयांमध्ये ‌‘दै. मुंबइ मित्र‌’साठी वितरणाचे काम करणाऱ्या अभिषेक तिवारीवर 2 जुलै रोजी अर्षद चौधरी व त्याच्या टोळी कडून त्याचे अपहरण करुन त्याला मारहाण करण्यात आली. ‌‘दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र‌’चे समुह संपादक अभिजीत राणे यांना मारून टाकू त्यासाठी 100 कोटी जरी खर्च करावे लागले तरी मागे पुढे पाहणार व स्थानिक पत्रकार बि. के. पांडे याला ही मारून टाकू असे धमकी देऊन मारहाण केली. याबाबतीत 6 दिवसांनंतर संपुर्ण तपासाअंती पेल्हार पोलीस ठाण्यात 10 जुलै रोजी भारतीय न्याय संहिता कलम 127 (2), 129, 135,, 138, 115 (2), 118 (1), 351 (2), 352, 140 (3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेल्हार पोलीसांनी पहाटे 7 वाजता अर्षद चौधरी व त्याचा भाचा राकिब याला राहत्या घरातून अटक केली असून तिसरा आरोपी कमलेश यादव अद्याप फरार असल्याचे पोलीसांनी सांगितले.
‌‘दै मुंबई मित्र‌’मध्ये 11 जुन रोजी ‌‘सर्व्हे क्र. 226 हिस्सा 2 गाव मौजे पेल्हार पलाशाचा पाडामध्ये भुमाफियांचा हैदोस‌’, 175 अनधिकृत बांधकामांना नोटीस देवुन कारवाई केलेली नाही अशी बातमी प्रसिध्द करण्यात आली होती. ही बातमी अभिषेक तिवारी त्याच्याकडे असलेल्या व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये वायरल करत होता. यावेळी अर्षद चौधरी ने अभिषेक ला फोन करुन ‌‘ये सब ग्रुप पे मत डालो वरणा अच्छा नही होगा‌’ असे सांगून धमकावले त्यावेळी अभिषेक ने तुम्ही आमचे पत्रकार बि.के. पांडे यांना सांगा कींवा कार्यालयाला कळवा. असे सांगितले. हाच सगळा राग मनात ठेऊन, 2 जुलै रोजी अभिषेक पालिकेच्या पेल्हार कार्यालयात सकाळी 10 वाजता पेपर वितरणाचे काम करून नालासोपारा फाटा येथे थांबला होता. अशावेळी अर्षद चौधरी व त्याचा भाचा राकिब तेथे गाडीतून आले व त्यांनी त्याला मारहाण सुरु केली.
एवढ्यावर न थांबता जबरदस्ती त्याला आपल्या गाडीत भरुन मारत-मारत उमर कंपाऊंड येथे अर्षद चौधरीच्या कार्यालयात नेले. तेथे लाथा बुक्क्यांनी मारहाण करत ‌‘तुने ठिक नही कीया, तेरा में सात दिन से फिल्डींग लगाया हू, में तेरे को मार दुंगा, तेरे पांडे का मार दुंगा, तेरे परिवार को मार दुंगा, और तेरे राणे को मार दुंगा, 100 करोड खर्चा करुंगा‌’ असे बोलत लाकडी दांड्याने मारहाण केली. वा याबद्दल कोणाला सांगितलेस तर तुला मारुन टाकू अशी दिली. काही वेळाने अर्षद चौधरीने त्याचा मित्र कमलेश यादव याला बोलवून घेतले त्यान येताच अभिषेकच्या कानशिलात लगावली ‌‘तुने बहोत नुकसान किया है‌’ असे बोलत पुन्हा मारहाण केली. यावेळी त्यांच्या शिवाय दोन जण उभे होते तेही अभिषेकला मारहाण करत होते.
त्यादरम्यान बि. के. पांडे यांना त्यांना मित्र फारुख कडून अशी घटना घडल्याची माहिती मिळाली होती त्यामुळे त्यांनी 112 ला संपर्क करुन त्यांना मिळालेली माहिती सांगितली. त्यामुळे घटनास्थळी पोलीस आले व त्यांनी अभिषेक व अर्षद चौधरी दोघांना पोलीस ठाण्यात आणले. यावेळी घाबरलेल्या अभिषेकने अर्षद चौधरीसमोर पोलीस ठाण्यात सुरुवातीस माझी कोणती तक्रार नसल्याचे पोलीसांना सांगितले होते. परंतू ही सर्व बाब ‌‘दै. मुंबई मित्र‌’ कार्यालयास समजली असता समुह संपादक अभिजीत राणे यांनी याबाबतीत पेल्हा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक यांच्याशी बोलून याबाबतचे गांभिर्य ओळखून कायद्याने गुन्हा दाखल करावा असे सांगितले. घटनेनंतर 7 दिवसांनी तपासाअंती गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *