
…कारवाईचा बडगा उगारण्यास पालिकेला मुहूर्त सापडेना !
गुप्ता नामक भूमाफियावर वालीव विभाग मेहेरबान?
वसई : प्रतिनिधी :
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीत सीसी घोटाळ्यासारखा गंभीर स्वरूपाचा घोटाळा उघडकीस आलेला असताना अनधिकृत बांधकामांचा वाढता आलेख आणि त्यातून सर्वसामान्य नागरिकांची होणारी फसवणूक महापालिकेला अद्याप रोखता आलेली नाही. पर्यायाने अनधिकृत बांधकामांवर वेळोवेळी कारवाया करण्यात महापालिका अधिकारी घेत असलेली बोटचेपी भुमिका अनधिकृत बांधकामांना खतपाणी घालत असल्याची चर्चा वसई विरारमध्ये होत आहे. याच अनधिकृत बांधकामांमुळे वसई वाढले आहे.
दरम्यान, कामण- सागपाडा रोड येथील देवदळ परिसरातील शिव कंपाऊण्डच्या बाजूला झालेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी पालिकेच्या वालीव विभागाने भूमाफियास एमआरटीपी नोटीस काढल्या आहेत. मात्र या नोटीसा अद्याप भूमाफियांना दिल्या नसल्याने नागरिकांत तिव्र नाराजी व्यक्त होत आहे. या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास पालिकेला अद्याप जाग आलेली नाही. अनेक दिवसांपासून सदर अनधिकृत बांधकामांना काढलेल्या नोटीसाच धुळखात पडल्या असल्याने पालिकेला धोकादायक अनधिकृत बांधकामांवर कारवाया करण्यासाठी किती तळमळ आहे, त्याचे चित्र दिसून येते. पालिकेला कारवाईसाठी जर मुहूर्ताची वाट पाहावी लागत असेल तर सदर अनधिकृत बांधकामात वालीव विभागाचे आर्थिक हितसंबंध दडले असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.
आधीच पालिकेने पालिका हद्दीत दरड कोसळण्याचा धोका असल्याचे वर्तवला आहे. नागरिकांना घरेही खाली करण्यास सांगितले आहे. असे असताना दरडप्रवण क्षेत्रातच अनधिकृत बांधकामं होत असताना पालिका शांत का असा सवाल वसई संस्कृती करत आहे. दरम्यान, वालीव विभागातील बेजबाबदार अधिकाऱ्यांनी केवळ कटेवर हात न ठेवता अनधिकृत बांधकामावर ज्या रितीने कारवाईच्या नोटीसा धुळखात ठेवल्या आहेत, त्यावरून सदर अनधिकृत बांधकामावर वालीव विभागाच्या अधिकाऱ्यांच्या प्रती किती संवेदना आहे, ते दिसते. पालिकेने या अनधिकृत बांधकामांचे लाड न करता कारवाई केली पाहिजे. तरंच गुप्ता नामक मस्तवाल भुमाफिया लायकित राहील व पालिकेच्या महसुलावर डल्लाही मारला जाणार नाही.