
कामाचे बिल तात्काळ थांबवून ठेकेदाराला काळ्या यादीत टाका. अन्यथा मा. लोकायुक्त यांच्याकडे संबंधित अधिकाऱ्यांची करणार तक्रार- प्रा. डी. एन. खरे












विरार दि. २२/०७/२०२४ अपात्र ठेकेदार, मे. ईरा एन्टरप्राइजेस (प्रो. मोहम्मद सोहेल खत्री) यांचे कंत्राट लायसन्स अवैध असतांना सुद्धा आयुक्त, अभियंता व अधिकारी यांनी ठेकेदारास पात्र ठरविल्याने वसई-विरारला पार लुटण्याचा बेत असल्याचे दिसून येत आहे.
वसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती “एफ” मधील मौजे- काशीद येथील तलाव शुशोभीकरण करणे. या कामाची अंदाजपत्रकीय रक्कम रु. १,३३,२८,२१५/- (एक कोटी तेहतीस लाख अठ्ठावीस हजार दोनशे पंधरा) रुपये इतकी असून या कामास ठराव क्र. १३ नुसार दि. १२/०४/२०२३ रोजी स्वतः आयुक्त अनिलकुमार पवार यांनी संविदा करण्यास मान्यता दिली.
तसेच जावक क्र.: व.वि.श.म./बांध/२३५/२३ नुसार दि. २५/०४/२०२३ रोजी कार्यकारी तथा शहर अभियंता श्री. राजेंद्र लाड यांच्या सहीनिशी मे. ईरा एन्टरप्राइजेस चे मालक श्री. मोहम्मद सोहेल खत्री यांना कार्यादेश देण्यात आला.
मे. ईरा एन्टरप्राइजेस (प्रो. मोहम्मद सोहेल खत्री) यांचे लायसन्स दि. १४/०१/२०१९ ते १३/०१/२०२२ पर्यंत वैध होते, त्या नंतर सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर यांनी त्यांना दि. १४/०१/२०२२ ते १२/०७/२०२२ पर्यंत तात्पुरती मुदतवाढ देऊन त्यांची नोंदणी करून घेतली.
परंतु, दि. ०२/०३/२०२३ रोजीच्या निविदा समितीच्या इतिवृत्ती नुसार प्रभाग समिती “एफ” मधील काशीद कोपर मौजे- काशीद येथील तलाव शुशोभीकरण करणे. या कामाचा वृत्तपत्रातील निविदा प्रसिद्धी दिनांक २०/१२/२०२२ असा होता, तसेच ई-टेंडरिंग फॉर्म खरेदी व ऑनलाईन स्वीकारण्याची तारीख दि. २३/१२/२०२२ पासून दि. १६/१२/२०२२ (तारीख संयुक्तिक वाटत नाही,) पर्यंत दुपारी ०३:०० वाजे पर्यंत होती. तसेच ई-टेंडरिंग द्वारे प्रथम लखोटा उघडण्याचा दि. २०/०१/२०२२ दुपारी ०३:०० वाजे पर्यंत होती. असे स्पष्ट नमूद केलेले आहे. सदरच्या इतिवृत्तीवर राजेंद्र लाड (कार्यकारी अभियंता), डॉ. किशोर गवस (उप आयुक्त), अरुण कोल्हे (मुख्य लेखा व वित्त अधिकारी), सुरेश बनसोडे (मुख्य लेखापरीक्षक), व अनिलकुमार पवार (आयुक्त) खुद्द यांनी % टक्केवारीच्या नशेमध्ये सदरची इतिवृत्ती न वाचताच स्वाक्षऱ्या केल्याचे सिद्ध होत आहे.
तसेच सदरच्या कामाचा सदोष ठराव, टिपणी व रिपोर्ट श्री. भावेश पाटील (कनिष्ठ अभियंता- ठेका, मुख्यालय), श्री. अनिकेत सुर्वे (कनिष्ठ अभियंता- ठेका, मुख्यालय), श्री. सुरेश शिंगाणे, (उप-अभियंता, बांधकाम विभाग- मुख्यालय), श्री. राजेंद्र लाड (कार्यकारीअभियंता), व डॉ. किशोर गवस (उप-आयुक्त) यांनी तयार करून आयुक्त यांना सादर केले.
एवढेच नव्हे तर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दि. १२/०४/२०२३ रोजीच्या ठराव क्र.- १३ नुसार सुद्धा मे. ईरा एन्टरप्राइजेस (प्रो. मोहम्मद सोहेल खत्री) यांचे लायसन्स अवैध आहे असे सिद्ध होते.
त्यामुळे असे सिद्ध होते की, मे. ईरा एन्टरप्राइजेस (प्रो. मोहम्मद सोहेल खत्री) यांचे लायसन्स, अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख दि. १६/१२/२०२२ रोजी पर्यंत वैध नव्हते. असे असतांना सदरच्या ठेकेदारास कंत्राट देण्याच्या नियमात गंभीर स्वरूपाची अनियमितता घडलेली आहे.
स्वतः आयुक्त अनिलकुमार पवार यांनी % टक्केवारीच्या नशेत स्वाक्षऱ्या केल्याचे बोलले जात आहे. मे. ईरा एन्टरप्राइजेस चे मालक प्रो. मोहम्मद सोहेल खत्री यांचे कंत्राट लायसन्स अवैध असतांना अभियंता व अधिकारी यांनी ठेकेदारास पात्र ठरविल्याने योग्य ती कार्यवाही करून कामाचे बिल तात्काळ थांबवावे व संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे. अन्यथा मा. लोकायुक्त यांच्याकडे संबंधित अधिकाऱ्यांची तक्रार करणार असल्याचे बहुजन समाज पार्टी चे पालघर जिल्हा प्रभारी प्रा. डी. एन. खरे यांनी सांगितले.