वसईतील उमेळमान गावातील प्रकार

सहा.आयुक्त निलेश म्हात्रे मॅनेज?

विरार(प्रतिनिधी)-बोगस बांधकाम परवानगीच्या आधारे इमारत उभारण्याचे सत्र वसई विरार पालिका क्षेत्रात राजरोसपणे सुरू आहे. विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी असेच बोगस सीसी-ओसी चे प्रकरण उघडकीस आले होते.त्यावेळी संपूर्ण यंत्रणा खडबडून जागी झाली होती. परंतु सदरचे प्रकरण शांत झाल्यानंतर पुन्हा एकदा बोगस कागदपत्रांच्या आधारे इमारती उभारण्यास विकासकांकरून सुरवात झाली आहे. नुकताच असाच एक प्रकार वसई पश्चिमेकडील वसई विरार पालिकेच्या प्रभाग समिती एच अंतर्गत येणाऱ्या उमेळमान गावात समोर आला आहे.याठिकाणी अवधूत अशोसिएट तर्फे वैभव पवार या विकसकाने पालिकेकडून बांधकाम परवानगी न घेताच बोगस बांधकाम परवानगी तयार करून त्याआधारे महालक्ष्मी अपार्टमेंट नामक अनधिकृत इमारती उभी केली आहे. सदर प्रकार वसईतील परवेज सिद्दीकी नामक सामाजिक कार्यकर्त्याने उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे याबाबत सबळ पुरावे करूनही पालिका अधिकाऱ्यांकडून केवळ नोटीस बजावण्यापुरतीच कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.परिणामी सहा.आयुक्त निलेश म्हात्रे मॅनेज झालेत का?अशी चर्चा उमेळमान गावात सुरू आहे.आणि सरकारी संस्थेला सादर केलेल्या डुप्लिकेट कागदपत्रांचा हा गुन्हा असूनही प्रभारी सहाय्यक आयुक्त नीलेश म्हात्रे यांनी जाणूनबुजून सरकारी दस्तावेज नक्कल केल्याप्रकरणी सत्तेविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल न केल्याने ही एफआयआर ही बातमी आणि कागदपत्र व्हायरल झाल्याची बातमी आल्यानंतर करण्यात आली. आरोपी अवधूत असोसिएट तर्फे वैभव पवार हा प्रभारी सहाय्यक आयुक्त निलेश म्हात्रे यांचा जिवलग असल्याचे दिसून येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *