
राज्य शासनाने वसई तालुक्यासाठी महसूल विभागाचे काम जलद गतीने व्हावे व नागरिकांना जलद सेवा मिळावी तथा तहसीलदार यांचा कामाचा भार कमी व्हावा याकरिता अप्पर तहसीलदार पदाची निर्मिती केली आहे. या पदावर मयूर भंगाळे (परिविक्षाधीन) यांची नियुक्ती केली आहे. मयूर भंगाळे हे २०२१ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या उपजिल्हाधिकारी पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना कोकण विभाग देण्यात आले आहे. सध्या त्यांना वसई तालुक्यात अप्पर तहसीलदार पदावर (परिविक्षाधीन) नियुक्ती करण्यात आली आहे. मयूर भंगाळे यांनी नुकताच अप्पर तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारला आहे.