
अपहरणकर्ता अर्षद चौधरी यांचे सहयोगी मुस्ताक शेख यांची अनधिकृत बांधकामे वगळून चिंचोटी हद्दीतील रस्ता शेजारील गरिबांचे बांबू प्लास्टिक चे ठेले तोडण्यात पालिकेला विशेष रस! उपायुक्त अजित मूठे यांच्यावर झालेल्या हल्लेखोरांची शिक्षा हातावर पोट असणाऱ्या जनतेला.
अपहरण प्रकरणात दोषी असणाऱ्या अर्षद चौधरी यांच्याशी मूस्ताक शेख यांचे जवळीक संबंध! संभाषित फोन कॉलची चौकशी होणे गरजेचे.


पालिका हद्दीत अनधिकृत बांधकामे डोकावत चालली आहेत.शहर विकसित होण्याच्या दृष्टीने अतिशय मागे पडत आहे.अनधिकृत बांधकामे शहराला पूरस्थिती मध्ये ढकलण्याचे काम करत आहेत.हरित पट्टा नष्ट करून काँक्रीट ची जंगले निर्माण करण्यात बांधकाम व्यावसायिक टपून बसले आहेत.सगळ्यांना सोबत घेऊन म्हणजे सातलोट घालून अर्थात मॅनेज करून महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामे वाढण्याच्या दिशेवर आहेत.जेवढा अनधिकृत बांधकामाला जबाबदार विकासक असतो त्याचप्रमाणे पालिका अधिकारी ही असतो.गैरप्रकार माहीत असून सुद्धा आर्थिक आमिषानां बळी पडून पालिका अधिकारी भ्रष्टाचार उत्पन्न करत चालले आहेत.वसई विरार महापालिका प्रशासनात कनिष्ठ अधिकाऱ्यांचा माज वरिष्ठ अधिकारी वर्गाच्या मानाने जास्तच असतो.चहा पेक्षा केटली गरम यातील प्रकार महापालिका प्रशासनात सुरू आहे.
वसई विरार शहरातील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर असताना जी प्रभाग हद्दीतील शिरलोत्तर याठिकाणी अनधिकृत बांधकाम धारकाकडून कारवाई साठी गेलेल्या पालिका उपायुक्त अजित मूठे आणि त्यांच्या टीमवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला.या हल्ल्याला अनुसरून पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला गेला आहे.याच अनुषंगाने प्रभाग जी हद्दीत गेले चार ते पाच दिवस कारवाई होत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे चाळी बांधकाम व्यावसायिक चांगलेच बावरले आहेत पण तोडक कारवाई ही नेमकी छोट्या चाळी बांधकामावर होत असल्याने मोठ्या इंडस्ट्रीयल बांधकाम धारकांना पालिका प्रशासनाने अभय दिले असल्याचे जनतेकडून बोलले जात आहे.त्याचप्रमाणे चिंचोटी हद्दीत कारवाईचे वारे वाहत असले तरी मुस्ताक नामक भूमाफियाचे बैलकडी,सागपाडा, मच्छी कम्पनी शेजारी आणि सागर हॉटेल च्या मागे जोमाने अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत.भूमाफिया मूस्ताक यांच्या अनधिकृत बांधकामांना वगळण्याचा प्रकार पालिका प्रशासनाची आर्थिक व्यावहारिक प्रवर्ग दर्शवत आहे.मूस्ताक या भूमाफियांचे प्रभाग एफ मधील अपहरण कर्ता अर्षद चौधरी यांच्याशी जवळीक संबंध असल्याने सूत्रांकडून समजले आहे.अपहरण कर्ता अर्षदला अपहरण करण्यामागे भूमाफिया मूस्ताक यांची फूस आहे.असे सूत्रांकडून कळले आहे.