
वसईकरांमधून संताप व्यक्त
अर्नाळा पोलीस ठाण्यावर काढला मोर्चा
नालासोपारा :- विरारच्या नवापुर येथील सेव्हेन सी रिसॉर्ट वर झालेल्या कारवाईनंतर वसईकरांमधून संताप व्यक्त केला जात आहे. रिसॉर्टवर झालेल्या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यासाठी शुक्रवारी हजारो वसईकरांनी अर्नाळा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढला.
मिलिंद मोरे यांचा झालेला मृत्यू हा आकस्मित होता सीसीटिव्ही कॅमेऱ्यात ते स्पष्ट दिसत आहे. मात्र पोलिसांनी व प्रशासनाने ती हत्या ठरवून ११ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला हे चुकीचे असल्याचा आरोप आंदोलन कर्त्यानी केला, त्यामुळे पोलिसांनी वाढविलेला हत्येचा कलम कमी करावे या मागणीसाठी हजारो वसईकर अर्नाळा पोलीस ठाण्यावर धडकले. पोलिसांचा मोठा बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला होता.