
मा. पालकमंत्री श्री. रवींद्र चव्हाण साहेब यांनी तात्काळ संविधान कृती समितीची मागणी पूर्ण करण्याचे दिले आदेश.
आज १६ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे झालेल्या पालघर मंत्री यांच्या जनता दरबारात संविधान कृती समितीचे समन्वयक ऍड. कीर्तीराज लोखंडे, गिरीश दिवाणजी, महेश राऊत, लवेश लोखंडे, गीता जाधव, मनोज जाधव, एकनाथ निकम, राजेश जाधव, विशाल खैरे, बाबल्या जाधव यांनी पालकमंत्री यांची भेट घेतली. यावेळी सदर शिष्टमंडळात प्रामुख्याने माजी सभापती श्री. सुदेश चौधरी, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र भोणे, अशोक शेळके, मनिष वैद्य कैलास पाटील, रिपाईचे जिल्हाध्यक्ष मा. सुरेश जाधव हेही उपस्थित
होते.
यावेळी मा. पालकमंत्री श्री. रवींद्र चव्हाण साहेब यांनी तात्काळ संविधान कृती समितीची मागणी पूर्ण करण्याचे सूचना व आदेश उपस्थित जिल्हाधिकारी व महानगरपालिकेचे अति. आयुक्त यांना दिले. तसेच कोणाही आंबेडकरी युवकांवर गुन्हे दाखल न करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त यांना पालकमंत्री यांना देण्यात आले.
सदर मागणी पालकमंत्री यांनी पूर्ण केल्यामुळे आनंद व्यक्त करीत उपस्थित संविधान कृती समितीच्या वतीने मा. पालकमंत्री श्री. रवींद्र चव्हाण यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
ही मागणी पूर्ण करण्यासाठी भाजपचे जिल्हाअध्यक्ष मा. भरत राजपूत यांनी महत्वाचे योगदान दिल्याबद्दल त्यांचे जाहीर आभार संविधान कृती समिती यांनी मांडले.