
देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ७ न्यायाधीशांच्या बेंच द्वारे १ ऑगस्ट २०२४ रोजी अनुसूचित व अनुसूचित जमातीचे वर्गीकरण करून क्रिमीलेयर लावणे संदर्भात असंविधानिक निर्णय दिलेला आहे. सदरचा निर्णय संविधान विरोधी असल्याने विनाविलंब संसदेचे विशेष सत्र बोलावून सदरचा निर्णय रद्द करण्यात यावा. तसेच आरक्षणाचा भारतीय संविधानाच्या ९ व्या अनुसूचित समावेश करावा. जेणेकरून यापुढे संविधानिक आरक्षणाशी कोणी छेडछाड करणार नाही.
बहुजन समाज पार्टी ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वातमोठी राष्ट्रीय पार्टी असून पक्षाचा भारतीय संविधानावर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन मायावतीजी यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा जातीयवादी दृष्टिकोन पुढे ठेऊन SC, ST प्रवर्गात वर्गीकरण व क्रिमीलेयर लागू करण्याच्या निर्णयाच्या विरोधात सर्वप्रथम सार्वजनिक रित्या विरोध केला.
सदरचा निर्णय संविधान विरोधी असल्याने तो रद्द करण्या करिता संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविण्या करिता व आरक्षणाला संविधानाच्या ९ व्या अनुसूचित टाकण्या करिता बुधवार दि. २१ ऑगस्ट २०२४ रोजी भारत बंद आंदोलनात बहुजन समाज पार्टीने (BSP) सक्रिय सहभाग घेतला असून महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी मा. राज्यसभा खासदार रामजी गौतम यांच्या दिशानिर्देशनात व प्रदेश अध्यक्ष मा. ऍड. सुनील डोंगरे यांच्या नेतृत्वात राज्यातील ३६ जिल्यामध्ये खालील मागण्या संदर्भात सक्रिय सहभाग घेतला आहे.
मागण्या:-
१) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती चे वर्गीकरण करून क्रिमीलेयर न लावण्याच्या संदर्भात संसदेत घटना दुरुस्ती करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करणे.
२) न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी प्रचलित कॉलेजियम पद्धत बंद करून न्यायाधीशांची नियुक्ती ऑल इंडिया जुडेशरी सर्व्हिस चे गठन करून आरक्षण लागू करावे.
३) OBC, SC, ST, NT, VJNT भटक्या समाजाच्या आरक्षणाला सुरक्षित करण्यासाठी संविधानाच्या सूची ९ मध्ये समाविष्ट करण्यात यावे.
४) जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी नुसार जातीनिहाय जनगणना करावी.
५) सर्वांना सामान न्याय या तत्वानुसार खुल्या प्रवर्गाचे वर्गीकरण करून क्रिमीलेयर लागू करण्यात यावे.
६) खाजगी संस्था (Private Sector) मध्ये आरक्षण लागू करावे.
७) जाती व्यवस्थेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शाळा सोडण्याच्या दाखल्यावर जात लिहिणे बंद करून जातीच्या दाखल्या ऐवजी प्रवर्गाचे प्रमाणपत्र देण्यात यावे.
८) OBC, SC, ST, NT, VJNT भटक्या जमाती व मागासवर्गीयांचा रिक्त असलेला पदांचा अनुशेष भरण्यासाठी आरक्षित व खुल्या प्रवर्गातील जागांच्या स्थितीचे स्वेतपत्र जाहीर करावे.
सदरच्या मागण्या घेऊन भारत बंद वेळी पालघर जिल्ह्यातील नालासोपारा बोईसर व वसई विधानसभा क्षेत्रातील बहुजन समाज पक्षाचे जिल्हा प्रभारी प्रा. डी. एन. खरे यांच्या नेतृत्वात भारत बंदची रॅली विरार पूर्व ते वसई तहसील कार्यालया पर्यंत काढण्यात आली. सदर रॅलीच्या समर्थानात वंचित बहुजन आघाडीच्या गीताताई जाधव, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे ऍड. गिरीश दिवाणजी व कम्युनिस्ट पक्षाचे ऍड. आदेश बनसोडे, मेहुल मोने, समाजसेवक- तावीज शेख, सुवर्णा जगताप, सुमित रुके, विष्णू वाघ, सचिन गोडसे, विजय रामराजे, विनोद गायकवाड, अजय जाधव, नईम ईद्रीसी, अमररत्न खंडागडे, विकास गायकवाड, राजकुमार जैस्वार, संदीप जैस्वार, सुलतान ईद्रीसी, रामावतार जैस्वार, विनोद गुप्ता, कैलास मौर्या उपस्थित राहून समर्थन दिले. या वेळी महामहिम राष्ट्रपती यांना प्रभारी तहसीलदार तथा न्याय दंडाधिकारी, वसई, मा. धोत्रे साहेब, यांच्या मार्फत निवेदन सोपविण्यात आले.