
संस्थेच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी, युवक आणि बालके ( intergenerational bonding) उपक्रमा अंतर्गत आज रविवार दि. २२ सप्टेंबर २०२४ रोजी ‘अंतर्नाद’ टीम द्वारे ‘रिमझिम धारा.. पाऊस वारा’ हिंदी आणि मराठी गाण्यांचा संगीतमय कार्यक्रम आयोजित केला गेला. त्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून ज्येष्ठ नागरिक, तसेच विल्सन कॉलेजच्या रोट्रॅक शाखेचे विद्यार्थी, वाघे हायस्कूलच्या विद्यार्थी व परिसरातील वस्तीतील विद्यार्थ्यांनी गाण्याच्या तालावर थिरकत मनमुराद आनंद लुटला. या प्रसंगी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिप्ती नाखले उपस्थित होत्या. तसेच विभागातील नागरिक व विविध स्तरातील मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे संयोजन यशवंतराव चव्हाण सेंटरच्या आरोग्य, दिव्यांगाच्या विभाग प्रमुख दिपिका शेरखाने व विभागाच्या सहाय्यक मनीषा खिल्लारे यांनी उत्कृष्ट रित्या केलं. यासाठी विप्लव वागदे, पवन गुजराथी, अशोक जाधव प्रवीणजी, प्रेम मिश्रा आणि टीम, हेजल आणि विल्सन कॉलेज टीम, जयेश,करण, यांचं विशेष सहकार्य लाभलं.