वसईतील ज्येष्ठ पत्रकार, तथा विद्यार्थीप्रिय शिक्षक श्री. हरिहर बाबरेकर सर यांचे आज सायंकाळी 6.30 वाजता दुःखद निधन झाले आहे. ते 81 वर्षांचे होते. उद्या, दि. 26 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता वसईतील पारनाका येथील राहत्या घरातून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. आज सकाळीच त्यांचे परमस्नेही, वसईचे शिक्षणमहर्षी श्री. सुरेश वायंगणकर सर यांच्या निधनाची घटना घडल्यापासून बाबरेकर सर दिवसभर अत्यवस्थ होते. न्यू इंग्लिश स्कुल या एकाच शिक्षण संस्थेत दोघांनीही प्रदीर्घ काळ एकत्र व्यतीत केलेला होता. शिवाय दोघांमध्ये प्रचंड स्नेहाचे संबंध होते. आज वसई 12 तासात दोन तपस्वीना मुकली आहे.

एक हाडाचे शिक्षक, तसेच प्रामाणिक आणि सत्वशील पत्रकार म्हणून सर्वत्र परिचित असलेले श्री. बाबरेकर सर उत्कृष्ट व्याख्याते म्हणूनही सर्वश्रुत होते. 1980 दशकात वसईतील पत्रकारांच्या पहिल्या पिढीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या बाबरेकर सरांचे माझ्या उमेदीच्या काळापासून (1988-89) ते अगदी परवा, परवा पर्यंत मला आणि माझ्या अनेक समकालीन सहकाऱ्यांना मार्गदर्शन लाभत आले. आमच्या पत्रकार संघाचे ते सल्लगार होते. पत्रकारांची आमची दुसरी पिढी घडविण्यात त्यांचा सात्विक संस्कार आणि लेखानाची प्रेरणा यांचा मोठा वाटा होता. याबद्दल सरांची कृतज्ञता व्यक्त करून ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गगती देवो, अशी प्रार्थना करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *