
बहुजन महापार्टीचे राष्ट्रीय अध्यक्षा तसलीमुन्नीसा खान हे सतत आजारी राहत असल्याने त्यांनी असे सांगितले आहे की, बहुजन महापार्टीचे उमेदवार वांद्रे पश्चिम :- मोहम्मद इलियास शेख, मालाड पश्चिम :- हाफिज याकूब सय्यद, वडाळा :- जलाल मुख्तार खान, मुंब्रा कळवा :- नाज मोहम्मद अहमद खान, परांडा :- शहाजहान पैगंबर शेख, पाचोरा :- मांगो पुंडलिक पगारे, तिवसा :- हर्षवर्धन बळीराम खोब्रागडे, कैज :- अशोक थोरात, माजलगाव :- फुलचंद राजाभाऊ मुंडे, वर्सोवा :- पवन देवबक्ष सिंह असे बहुजन महापार्टीचे उमेदवार असून यांना निवडून आणणेकामी यांच्या विधानसभा क्षेत्रात कार्यक्रमाचे आयोजन करणे व योग्य प्रकारे प्रचार करून निवडून आणणे आवश्यक आहे.मी सतत आजारी राहत असल्याने मला महाराष्ट्राचा दौरा करणे शक्य होणार नसल्याने मी या पदावर शमसुद्दीन खान यांची निवड करीत आहे. बहुजन महापार्टीची या पक्षाची स्थापना सन २०१७ मध्ये झालेली असून तेव्हापासून आजपर्यंत मीच अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळून अनेक राज्यात निवडणूक लढविले आहे व पक्षाचा विस्तार केलेला आहे. मी सतत आजारी राहत असल्याने व मला जाणे येणे शक्य नसल्याने डॉक्टरांनी मला आराम करण्याचा सल्ला दिलेला असल्याने मी राष्ट्रीय अध्यक्ष या पदाची जबाबदारी शमसुद्दीन खान यांना देत आहे असे तसलीमुन्नीसा खान यांनी सांगितले आहे.