
नालासोपारा दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत १३२ – नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे प्रहार जनशक्ती पक्ष व परिवर्तन महाशक्ती आघाडीचे अधिकृत उमेदवार धनंजय विठ्ठल गावडे यांना ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे.
ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाई केदार यांच्या मार्गर्शनाखाली पालघर जिल्हाध्यक्ष मनोज खाडे यांनी धनंजय गावडे यांना जाहीर समर्थनाचे पत्र सुपूर्द केले आहे. यावेळी मनोज खाडे यांच्यासह ऑल इंडिया पँथर सेनेचे प्रदेशाध्यक्ष संदेश वाघचौरे व संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होतें.
विरार नालासोपाराच्या सर्वांगीण विकासासाठी ऑल इंडिया पँथर सेनेच्या माध्यमातून आपल्या सोबत मोठी ताकद उभी करुन आपल्याला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार आम्ही करत आहोत, असा विश्वास मनोज खाडे यांनी यावेळी व्यक्त केला. धनंजय गावडे यांनी मनोज खाडे यांच्यासह ऑल इंडिया पँथर सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.