बोईसर विधानसभेचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार व विद्यमान आमदार राजेश पाटील यांनी पालघर पूर्व भागात प्रचारात आघाडी घेतली असून त्यांना मतदारांचा मोठा प्रतिसाद लाभत असल्याने विरोधकांची ही पायाखालची जमीन सरकली आहे.

बोईसर विधानसभेचे विद्यमान आमदार असताना त्यांनी या भागांतील प्रत्येक गावात विकास कामांची गंगा आणली आणली असून या भागांतील अनेक प्रश्ण त्यांनी विधानसभेत उपस्थित करून या समस्या बाबत सरकारला जागे करत या समस्या सोडवून घेतल्या आहेत. सामान्य माणसात राहून त्यानी पाच वर्ष काम केल्याने पालघर पूर्व भागात त्यांना मोठा जनाधार लाभत आहे

पालघर तालुक्यातील पूर्व भागात ढेकाळे, गांजे, खेरे, वेहरोली, सातीवली, कुडे, बोट, हलोली, साया, दुर्वेश, सावरा, पाचूधारा, सावरखंड, कोसबाड, दापचरी, या भागात मंगळवारी राजेश पाटील यांनी प्रचार दौरा करून प्रत्येक गावाला आपली भेट दिली यावेळी या गावातील मतदारांनी राजेश पाटील यांना मोठा प्रतिसाद देत आपण बहुजन विकास आघाडीच्या पाठीशी असल्याची व राजेश पाटील यांनाच या विधानसभेत बोईसर मधून आमदार म्हणून पाठवणार असल्याचे मतदारांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *