
बुधवार दि.१३ नोव्हेंबर रोजी वसई पुर्व विभागात धावता दौरा आयोजित करण्यात आला टिवरी येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून व मानवंदना देऊन या दौऱ्यास सुरूवात करण्यात आली.टिवरी,राजिवली,मधुबन मार्गे,गोखिवरे,फादरवाडी,बोयदापाडा,सातिवली,वालीवगांव,वर्धमान मार्गे,गावराईपाडा,संतोषभुवन,बिलालपाडा,धानीव,शांतीनगर,नवजीवन,वसईफाटा (कार्नर मिटिंग) व पेल्हार (सोपाराफाटा) येथे या दौऱ्याचा समारोप करण्यात आला.
या दौऱ्या दरम्यान प्रत्येक ठिकाणी उमेदवारांचे जंगी स्वागत करण्यात आले,महिलांकडून औक्षण करण्यात आले तर युवकांनी बाईक रॅलीच्या माध्यमातून अभूतपूर्व सहभाग नोंदवून वेगवेगळ्या विभागातील बविआचे पदाधिकारी,आजी माजी लोकप्रतिनिधी,यांच्या मार्गदर्शनात संपुर्ण महानगरपालीका क्षेत्रातील मतदार संघात प्रचंड उत्साहात हा दौरा यशस्वी करण्यात पुढाकार घेतला.
मतदारांतील उत्साह व उमेदवारांच्या दौऱ्याचा झंजावात यातून बोईसर विधानसभेचे लोकप्रिय उमेदवार यांचा दांडगा जनसंपर्क दिसून आला आणि विजय हा बविआचाच होणार ! याची खात्री मतदार देत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे.