
वसई, १५ नोव्हेंबर २०२४: वसईत विकास परिवर्तन घडवण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले महाविकास आघाडीचे उमेदवार विजय पाटील यांना सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळत आज. शुक्रवारी. वसईच्या पश्चिम आणि पूर्व पट्ट्यात विजय पाटील यांच्या प्रचार रॅलीचे ठिकठिकाणी जंगी स्वागर करणात आले. फुलांची उधळण करत सत्कार केला, तर माता भगिनींनी औक्षण केले आणि विजयासाठी पाठिंबा जाहीर केला.
वसई पूर्वपट्टीचे लोकप्रिय नेते विजय पाटील यांची शुक्रवारी भव्य प्रचार रॅली निघाली. वसई पूर्वेच्या बाफाणे, चंद्रपाडा, स्टारसिटी नाका, ओरनेट गॅलेक्सी, शिवसेना शाखा, तसेच वसई पश्चिमेच्या उमेळे परियम नगर, खोचीवडे, पापडी, सागरशेत, ६० फूट रोड, झेडा बाजार, गिरीज, निर्मळ नाका, सत्पाळा नाका, क्रॉस नाका, दोन तलाव, अर्नाळा, कोल्हापूर ग्रामपंचायत कार्यालय, डिसील्स नगर, सनसिटी रोड, कृष्णा टाऊनशीप, अंबाडी रोड सर्कल, समता नगर, दीवाणमान नगर, शिवाजी चौक, माणिकपूर हनुमान मंदीर, दोस्ती परिसर, उमेळमान हनुमान मंदीर आदी ठिकाणाहून प्रचार यात्रा निघाली.
या प्रचार रॅलीत विजय पाटील यांनी दुकानदारांशी, आळींमधील रहिवाशांशी संवाद साधला, त्यांच्या समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले. वसई कोळिवाड्यांमधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन, आम्हा सर्व-सामान्यांचे नेते जिंकून आले तर आमच्या सर्व समस्या दूर करतील अशी आशा व्यक्त केली. रॅलीदरम्यान संवाद साधताना विजय पाटील म्हणाले की, वसई ग्रामीण आणि शहरातीस नागरी समस्या सोडवून वसईला भ्रष्टाचार मुक्त करणार, वसईला अनधिकृत बांधकामांच्या जंजाळातून सोडवणार आणि हरित-समृद्ध-विकसित वसई घडवणार.
या भव्य प्रचार रॅलीत काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच या रॅलीत नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. विजय पाटील यांच्या नावाने नारे दिले, हाताचा पंजाच वसईत परिवर्तन घडवेल अशी आशा नागरिकांमध्ये दिसून आले.