
वसई, १५ नोव्हेंबर २०२४: भगवान गुरुनानक यांच्या ५५५ व्या जयंतीच्या निमित्ताने शुक्रवारी वसई विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विजय पाटील यांनी वसईच्या अंबाडी रोड येथील गुरुद्वाराला भेट दिली. यावेळी पगुरुद्वारातील धर्मगुरुंनी पाटील यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा आणि आशिर्वाद दिले.
शीख धर्मिय समुदायासाठी गुरुनानक जयंती हा पवित्र दिन आहे. भगवान गुरुनानक यांची ही ५५५ वी जयंती जगभर साजरी झाली. यानिमित्ताने काँग्रेसचे जेष्ठ नेते विजय पाटील यांनी वसईच्या गुरुद्वाराला भेट दिली. यावेळी त्यांनी वसईच्या समृद्ध विकासासाठी प्रार्थना केली. वसईवरील भ्रष्टाचाराचे, अनधिकृत बांधकामांचे, गैरसोयींचे संकट दूर होण्याची कामना केली. भगवान गुरुनानकांची शिकवण संपूर्ण देशाला सकारात्मकतेकडे घेऊन जाणारी आहे, असे वक्तव्य विजय पाटील यांनी यावेळी केले.
शुक्रवारी विजय पाटील यांची वसईच्या पूर्व आणि पश्चिम पट्ट्यात भव्य प्रचार रॅली होती. मात्र या रॅलीतून वेळात वेळ काढून भगवान गुरुनानकांना स्मरण करून, आशिर्वाद घेतले. यावेळी प्रार्थनास्थळातील धर्मगुरुंनी विजय पाटील यांना शुभेच्छा आणि आशिर्वाद दिला. गुरुद्वात उपस्थित असलेल्या नागरिकांनी आणि शीख बांधवांनी विजय पाटील यांना पाठिंबा निवडणुकीसाठी पाठिंबा दर्शवला.