
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून जनतेचं भलं करण्याऐवजी बिल्डर लॉबीला पोसन सुरू आहे! लोकप्रतिनिधीचें जाणीवपूर्वक दुर्लक्ष.
मौजे काशीद कोपर अंतर्गत खानिवडे शेरे पंजाब हॉटेलजवळ साजिद नावाच्या भूमाफियाचे अवैध बांधकाम! भुमाफीया साजिद मुंबई अहमदाबाद हायवेवर बेकायदा बांधकाम करून महापालिकेला खुलेआम आव्हान देत आहे.
प्रभाग समिती “फ” पेल्हार सहआयुक्त गिल्सन गोन्साल्विसचे संरक्षण! मिलिंद किणी यांनी त्यांचे मालक साजिद यांच्या सांगण्यावरून निर्भयपणे बांधकाम पूर्ण केले.
मौजे काशीद कोपर अंतर्गत खानिवडे शेरे पंजाब हॉटेलजवळ साजिद नावाच्या भूमाफियाचे अवैध बांधकाम निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सुरू होऊन नुकतेच पूर्ण होत आले आहे.वरील बेकायदेशीर बांधकामाची तक्रार २४/१०/२०२४ रोजी देण्यात आली आहे सोबत त्यावेळेसचे छायाचित्र जोडण्यात आले आहे.परंतु अद्याप वरील बेकायदेशीर बांधकामावर तोडक कारवाई करण्यात आलेली नाही.वारंवार प्रभाग समिती एफ चे सहआयुक्त गिल्सन गोन्साल्विस यांना तोंडी तक्रार करून तोडक कारवाई करण्यास सांगितले असता त्यांनी आश्वासनऐवजी फक्त आणि फक्त अतिक्रमण उपायुक्त अजित मूठे यांच्याकडे बोट दाखवण्याचे काम केले.तसेच अतिक्रमण उपायुक्त अजित मूठे यांना सम्पूर्ण बेकायदेशीर बांधकामाबाबत आधीपासूनच आयुक्तांच्या कारवाई करण्याच्या पूर्वसूचना होत्या पण त्यांनी आयुक्तांना वेठीस धरून अजूनही कारवाई करण्यास टाळाटाळ करताना दिसत आहे.याचप्रमाणे उपायुक्त अजित मूठे यांना अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले यांची फूस असल्याकारणाने सी.यु.सी विभाग आपल्या मर्जीप्रमाणे चालवण्याचा गोरखधंदा मूठे यांच्याकडून सुरू आहे.प्रत्येक प्रभागातुन अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी संबंधित अधिकारी सी यु सी विभागाकडे विषय असल्याचं सांगून मोकळे होत असल्याचं सांगण्यात येत आहे.