
भ्रष्टाचार आणि प्रभाग जी याच समीकरण तस जुनंच त्यात आयुक्ताच्या गळ्यातील तावीज अतिरिक्त आयुक्त संजय हेरावडे व त्याची हऱ्या नाऱ्याची टीम भुमाफियाना वरदान ठरत आहे.
वसई विरार मध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत परिवर्तन पहायला मिळाले, मागील सत्ताधीशाचा सूर्यास्त झाला नवीन सत्ताधीश प्रस्तापित झाले. पण वसई विरार महापालिका आपली अनधिकृत बांधकाम संदर्भात जगविख्यात मालिन प्रतिमा तशीच राखली आहे.
प्रभाग जी येथील अनधिकृत बांधकाम नियत्रीत आणण्याचे काम अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांना सोपविण्यात आले होते. तेच संजय हेरवाडे आणि त्याची हऱ्या नाऱ्या ची टीम अर्थात कस्तुब ताबोरे आणि अरुण सिग यांनी सरकारी फर्मानाची तुडवणी करून भुमाफियाना खुली छुट दिली.
अनेक अनधिकृत बाधकामे प्रभागत कार्यरत असून सातवली येथे राजकुमार यादव तर बफाना येथे पटेल कंपनी हजारो लाखो sq कामे बिन्दास्त संजय हिरवाडे याच्या आशीर्वादाने करीत आहेत.
आता नवनिर्वाचित आमदारांनी सर्व प्रथम अश्या अ कर्तव्य निष्ठ अधिकाऱ्याचे जाहीर सत्कार करावा ही मागणी स्थानिक नागरिकांन मध्ये होताना दिसत आहे.