
विरार दि. २८/११/२०२४, वसई-विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग समिती “एफ” मौजे- मांडवी तलाव सुशोभीकरण करणे. या कामाचा ठेका मे. श्री. सदगुरु कन्स्ट्रक्शन चे मालक श्री. सतीश पुरुषोत्तम पाटील यांना देण्यात आलेला आहे. सदरच्या कामासाठी अंदाजपत्रकीय रक्कम रु. १,३३,२८,२१५/- (एक करोड तेहतीस लाख अठ्ठावीस हजार दोनशे पंधरा) रुपये मंजूर करण्यात आलेली असुन कामाचा कार्यादेश दि. २६/०४/२०२३ रोजी दिलेला सदरचे काम पुर्ण करण्यासाठी १८ महिने मुदत देण्यात आलेली होती. परंतु सदरचा कामाचा कालावधी संपलेला असून सुध्दा अद्याप पर्यंत काम पूर्ण झालेले नाही.
महत्वाची बाब अशी की, सदर कामाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची अडचण नसतांना सुद्धा ठेकेदाराच्या अकार्यक्षमते मुळे काम रखडलेले आहे.
त्यामुळे, संबंधित ठेकेदारास रीतसर नोटीस देऊन निर्धारित वेळेत काम पूर्ण न केल्याने तात्काळ काळ्या यादीत लायसन्स टाकण्यात यावे. तसेच सदरच्या ठेकेदारास कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ कार्यादेश देण्यात येऊ नये. अशी मागणी बहुजन समाज पक्षाच्या वतीने प्रा. डी. एन. खरे यांनी केली