
वसई । वार्ताहर ः तक्रारदाराच्या विरोधात खोटा अर्ज करणाऱ्या केंद्र प्रमुखावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे.
पालघर-दहिसर येथील जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख प्रभाकर भोईर यांच्या मनमानी कारभाराची वसईतील सामाजिक कार्यकर्ते एलायस डिसील्वा यांनी पालघर शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती.महिला शिक्षीकांना भोईर त्रास देत असल्याच्या तक्रारीवरुन भोईर यांच्यावर कारवाई ही करण्यात आली होती.
त्यानंतर डिसील्वा यांनी भोईर यांच्यावर गंभीर आरोप करत शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.त्यांच्या तक्रारीनुसार,प्रभाकर भोईर यांनी कारवाई टाळण्यासाठी मला मॅनेज करायचा,वसईतील ऋषिकेश हॉटेलमध्ये लाच देण्याचा आणि महिला शिक्षीकांमार्फत स्वतःची बाजु मांडण्याचा ही त्यांनी प्रयत्न केला.एका शिक्षकामार्फत माझ्या घरी येऊन त्यांनी माफी मागून प्रकरण संपवण्याची विनंतीही त्यांनी केली होती.त्यांच्या या सर्व प्रलोभनाला मी बळी पडत नसल्याचे दिसल्यावर भोईर यांनी माझी बदनामी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.त्यांनी खोटा अर्ज ही केला आहे.
त्यामुळे त्यांच्या खोट्या अर्जाची आणि वसईत कार्यरत असताना कामण आणि चंद्रपाडा या ठिकाणी केलेल्या उपद्वापाची,२७ एप्रिल ला शाळा बंद करून खैरपाडा येथे शिक्षकांना घेऊन केलेल्या पार्टीची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी.अशी मागणी डिसील्वा यांनी केली आहे.
