
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सामाजिक न्याय विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):
दिनांक १४ जानेवारी हा नामांतर दिन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. या सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग प्रदेश अध्यक्ष मा. पंडित कांबळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव मिळावे म्हणून अनेक दलित बंधुभगिनों शहीद झाले. अनेकांच्या घराची राख रांगोळी झाली अशा व्यक्ती येथे शहीद झाले. या मध्ये अनेक प्रमुख नावं आहेत. नामांतर वादळ सुरू होत त्या
काळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. शरद पवार साहेब हें होते, त्यांनी मोठ्या कसोशीने व प्रयत्न करून दोन्ही सभागृहाला ठराव मांडून डॉ. वावासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाचा सोहळा घडवून आणला. या घटनेला आज तीस वर्ष पूर्ण होत आहेत. विद्यापीठ परिसर शहिदांच्या व बाबासाहेबांच्या घोषणांनी गर्जुन गेला होत्ता. मोठ्या श्रध्दाने बांधव भगिनी अभिवादन करीत होते काही शौर्य गाथा ऐकत होते कोणी गीतातुन बाबासाहेबांचे व शहिदांचे गुण गाण ऐकत होते आणि नतमस्तक होत होते. नागरिकांनी मोठ्या
प्रमाणात उपस्थित राहून अभिवादन केले.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) चे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग तांगडे, शहर अध्यक्ष खाजा भाई, सामाजिक न्याय विभागाच्या राज्य उपाध्यक्षा ललीताताई मगरे, सामाजिक न्याय जिल्हा अध्यक्ष उध्दव बनसोडे शहर अध्यक्ष अनिल डोंगरे, मिसाळ, वाघमारे, आशिष इंगळे, अपंग सेल चे इंगळे साहेब, वैजापूर अल्लापूर बाडी चे रतन जी पगारे, अहमदनगर चे जिल्हा अध्यक्ष अभिजीत ससाणे, उपाध्यक्ष जाधव सर असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा. पंडितदादा कांबळे हे छत्रपती संभाजीनगर येथे आले असता त्यांचा सत्कार करतांना राज्य उपाध्यक्षा ललीताताई मगरे व इतर मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत.