
संरक्षण देणाऱ्या भ्रष्ट ठेका अभियंता युवराज पाटील या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी
वसई(प्रतिनिधी)-वसई विरार पालिकेच्या प्रभाग समिती जी अंतर्गत येणाऱ्या गोखीवरे येथे मोठया प्रमाणावर अनधिकृत बांधकामे खुलेआमपणे उभी राहत आहेत या ठिकाणी “में.चेतना लॅन्ड डेव्हलपर्स तर्फे भागीदार संतोष एम.तिवारी-व पन्नालाल आर.मिश्रा-यांनी वाढीव बांधकाम केले आहे. सदरच्या बांधकामावर पालिकेने अदयाप तोडक कारवाई न केल्यामुळे पालिकेच्या कारवाईवर
प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तसेच वाढीव बांधकाम करून सुद्धा दि. 18/05/2018 रोजी नगररचना विभागाने भोगवटा दाखला दिला आहे.सदर प्रकारावरून एकप्रकारे पालिका प्रशासन “में.चेतना लॅन्ड डेव्हलपर्स तर्फे भागीदार संतोष एम.तिवारी व पन्नालाल आर.मिश्रा- वाढीव बांधकामावर कारवाईस चालढकल करीत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे या बांधकामास संरक्षण देणारे प्रभाग समिती जी चे भ्रष्ट ठेका अभियंता युवराज पाटील यांच्यावर निष्क्रियतेचा ठपका ठेवून निलंबनाची कारवाई
करण्यात यावी पण आयुक्तांकडून अजूनही कोणत्याही स्वरुपाची कारवाई होत नसल्याने निष्क्रिय भ्रष्ट ठेका अभियंता युवराज पाटील आजही मोकाट आहेत.शिवाय अशा निष्क्रिय. भ्रष्ट ठेका अभियंता युवराज पाटील मुळे पालिकेचा लाखो रुपयांचा महसूल ही बुडत आहे.
