अल्पसंख्यांक युवा संसद मधील सूर विविध धर्मातील नेत्यांची उपस्थिती,
देशात जातीयवाद, धार्मिकवाद वाढत आहे विविधतेमधे, एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे, मात्र काहींना ते नको आहे, या विचारांचा प्रतिकार करणे गरजेचे आहे, विविध धर्मामधील युवकांनी ही जबाबदारी घ्यावी असा सूर अल्पसंख्यांक युवा संसद मध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्य साधून पुण्यात ‘मायनॉरिटी युथ पार्लमेंट’चे युवा अल्पसंख्यांक संसद भव्य आयोजन
युवकांचे सशक्तीकरण, शिक्षण, रोजगार यावर विविध मान्यवरांचे मार्गदर्शन, पुण्यातील गणेश कला क्रीडा संकुल स्वारगेट येथे उत्साहात पार पडले. अल्पसंख्याक समाजातील युवकांच्या सशक्तीकरणासाठी नोकरी, शिक्षण आणि रोजगार अशा अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर कार्यक्रमात सखोल चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमात देशभरातील नामवंत नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि धर्मगुरू यांनी उपस्थिती लावून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुण्यांमध्ये बिहारचे खासदार पप्पू यादव, कश्मीरचे खासदार मोहीमुल्लाह नदवी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे, पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे, अभय छाजेड, माजी आमदार मोहन जोशी, एडवोकेट भाई विवेक चव्हाण, माजी नगरसेवक रफिक शेख, माजी अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष हाजी अरफात शेख, ख्रिश्चन धर्मगुरू डॉ. थॉमस डाबरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, ख्रिश्चन नेते पीटर डिसूजा, NSUI चे माजी अध्यक्ष एडवोकेट अमीर शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवा नेते पाहत अहमद व उमेश चव्हाण, रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे आयोजन हाजी जुबेर मेमन, लुकास केदारी, सत्यवान गायकवाड, एडवोकेट, सुलतान फतेह अली खान, फिरोज महसूलदार, बलिग नोमानी, फरीद खान यांनी संयोजक म्हणून समर्थपणे पार पाडले.

कार्यक्रमात विविध विषयांवर सत्र घेण्यात आले असून, युवा अल्पसंख्याकांचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी धोरणात्मक दृष्टिकोन मांडण्यात आला. कार्यक्रमास महाराष्ट्रातील विविध भागांतील युवकांचा मोठ्या संख्येने सहभाग लाभला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *