
जागतिक पुस्तक दिनानिमित्त श्रमदान ग्रंथालयासाठी पुस्तक भेट कार्यक्रम…
पुणे, दि.२६ एप्रिल २०२५ — जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून येत्या शनिवारी, २६ एप्रिल रोजी श्रमदान ग्रंथालय ९९ महात्मा फुले पेठ पुणे येथे एक विशेष पुस्तक भेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन गणेश पेठेतील गणेश मंडळांनी एकत्रितपणे केले आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मधुमिलिंद मेहेंदळे, नगर वाचन मंदिर अध्यक्ष आणि अनुजा कुलकर्णी, कार्यकारी संचालक, पुणे मराठी ग्रंथालय हे उपस्थित.
कार्यक्रमाची प्रस्तावना श्रमदान मारुती मंडळाचे मोहनिश सावंत यांनी केली,तर कार्यक्रमाच्या शेवटी राजेंद्र कोंढरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे आयोजक:गणेश उत्सव अभ्यासक आणि पत्रकार माननिय आनंदजी सराफ,काळभैरवनाथ मंडळ-श्री.उमेश सपकाळ,चेतन शिवले ,पोटसुळ्या मारुती मंडळ- कुणाल पवार,गणेश पेठ.
पुस्तकांना नवा श्वास आणि वाचकांना नवा प्रकाश देणारा हा उपक्रम निश्चितच वाखाणण्याजोगा आहे!