
- “डॉ. बाबासाहेबांच्या विचारांना समर्पित आरोग्य उपक्रम: खा. हेमंत सावरा
- आरोग्याची आणि सन्मानाची हमी देणे हाच आमचा खरा आदरांजलीचा मार्ग : आ. स्नेहा दुबे पंडीत
वसई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपा कडून “सम्मान अभियान” अंतर्गत सिध्दार्थ जागृती संघच्या संयुक्त विद्यमाने भव्य मेगा मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. बऱ्हामपूरयेथील बुद्धविहार येथे पार पडलेल्या कार्यक्रमास पालघर जिल्ह्याचे खासदार डॉ. हेमंत सावरा, वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडीत यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली. सर्व डॉक्टर व परिचारिका यांचा सत्कार स्नेहा दुबे पंडित यांच्या हस्ते करण्यात आला.
या कॅम्पमध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी, रक्तदाब, मधुमेह, दंतचिकित्सा, नेत्र तपासणी, स्त्रीरोग तपासणी यासारख्या विविध सेवा पुरवण्यात आल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला सामाजिक समतेचा संदेश आम्हाला आरोग्यसेवेमार्फत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. ‘सम्मान अभियान’ अंतर्गत हा मेगा मेडिकल कॅम्प म्हणजे त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्याची एक छोटीशी प्रेरित कृती आहे. अशी प्रतिक्रिया पालघरचे खासदार डॉ. हेमंत सावरा यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार म्हणजे वंचित, दुर्बल घटकांसाठी आशेचा किरण आहे. आजच्या या मेडिकल कॅम्पद्वारे त्यांच्या विचारांना कृतीत उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक व्यक्तीला आरोग्याची आणि सन्मानाची हमी देणे हाच आमचा खरा आदरांजलीचा मार्ग आहे. अशी प्रतिक्रिया वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडीत यांनी दिली.
अभियानाचे संयोजक उत्तम कुमार यांनी बोलताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य आणि त्यांचा सामाजिक समतेचा संदेश आम्हाला नेहमीच प्रेरित करत आला आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही ‘सम्मान अभियान’ अंतर्गत आरोग्याच्या माध्यमातून समाजसेवेचा संकल्प केला. या मेगा मेडिकल कॅम्पमुळे गरजू लोकांना दर्जेदार आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देता आल्या, ही आमच्यासाठी मोठी समाधानाची बाब आहे. नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा आम्हाला पुढील सेवाभावी उपक्रमांसाठी बळ देणारा आहे. भविष्यातही आम्ही असेच उपक्रम राबवत राहू, आणि डॉ. बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर चालत समाज कल्याणासाठी कटिबद्ध राहू. अशी प्रतिक्रिया दिली.
भाजपा “सम्मान अभियान” अंतर्गत हा उपक्रम राबवला गेला कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून, सिद्धार्थ जागृती संघ चे अध्यक्ष रमेश शेंडे, सचिव अतुल मोठगरे, कार्याध्यक्ष उषा ठोमरे, भाजपा जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, जिल्हा महासचिव अभय कक्कड, जिल्हा महासचिव प्रज्ञा पाटील, वसई विधानसभा प्रमुख मनोज पाटील,, वसई पश्चिम मंडळ अध्यक्ष आशिष जोशी, वसई पूर्व मंडळ अध्यक्ष उदय शेट्टी, शेखर धुरी उपस्थित होते.
अभियानाचे संयोजक उत्तम कुमार, दिलीप गायकवाड सहसंयोजक व युवा संयोजक सिद्धेश तावडे यांच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळा सावंत, शेमल अजगीया, रामानुजम सिंग, श्रीकुमारी मोहन, शिला अय्यर, केतन गांधी, चारुशीला घरत, सीमा सेंगर, देवी रेड्डी, सुनील चौहान, निखिल बाबर यांनी विशेष मेहनत घेतली.