
भारत पुरुषसत्ताक देश असला तरी हिंदुस्थानाने इथल्या स्त्रियांना “मनुस्मृती” प्रमाणे अतिशय घृणास्पद वागणूक दिली आहे,पूर्वीपासून बालविवाह,केशवपन,सती प्रथा,कावळा शिवला,बुरखा,देवदासी अशा हिडीस प्रथा लादून स्त्रियांच्या चारित्र्याचे मूल्य-मापन करण्याचा ठेका जणू इथल्या व्यवस्थेनेच घेतला होता,यातील काही प्रथा जरी बंद झाल्या असल्यातरी,आज ही स्त्रियांनी दहा-दहा अपत्य काढावीत,स्त्रियांना आम्ही उचलून आणू असे सत्ताधाऱ्याकडून कसलीही भीती न बाळगता विधान केले जाते, कालच मुंबईच्या महापौरांनी स्वतःच्या पदाचा धाक दाखवत जाब विचारणाऱ्या स्त्रीचा हात पकडून ओढाताण केली,युपी सारख्या ठिकाणी गावातील रोगराईला स्त्रीला जबाबदार ठरवून तिला चेटकीण म्हणून दगडाने ठेचून मारण्यात आले, काही ठिकाणी फक्त जाती/धर्मामुळे स्त्रीला पाणी भरण्यास नकार,सरपंच होण्यास नकार,स्वतंत्र भारताचा ध्वजारोहण करण्यास नकार,स्त्रीयांची नग्न धिंड हे प्रकार घडतच आहेत..
ब्रिटन देशातील चॅरिटेबल संस्था “थॉमस राउटर फाउंडेशन” हे जगातील सर्वात मोठे न्यूजबेस नेटवर्क आहे,हवामान,पत्रकारिता,मानवी अधिकार,स्त्री अत्याचार यावर ते काम करतात,११७ देशात जर्नालिस्टला ते ट्रेनिंग देतात,अनेक जागतिक जर्नलिझम चे पूरस्कार या संस्थेच्या नावावर आहेत,२०१८ ला केलेल्या सर्व्हे नुसार यांच्या मते,”भारत हा देश स्त्रियांसाठी सर्वात भयंकर देश आहे” त्यांची ही माहिती डेटाबेस नसून तज्ज्ञांच्या आधारावर आहे असे ते म्हणतात,या सर्व्हेसाठी ५४८ तज्ञ कार्यरत होते त्यात ४१ भारताचे होते,त्यासाठी १९२ देशांची आकडेवारी काढली,त्यात लैंगिक शोषण,मानवी हिंसाचार,सांस्कृतिक व धार्मिक नावाने स्त्रियांवर अत्याचार, बालविवाह,ऍसिड अटॅक अशी वर्गवारी केली. आणि त्यांनी पुढीलप्रमाणे प्रत्येक देशास क्रमांक दिले १) भारत २)अफगाणिस्तान ३)सीरिया ४)सोमालिया ५)सौदी अरेबिया ६) पाकिस्तान..२०११ साली करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये भारत ४ क्रमांकावर होता.
लोवेस्ट आणि हायेस्ट क्राईम रेट मोजण्याची एक पद्धत आहे उदा.आपण म्हणू की पाकिस्तान,सीरिया सारखे देश भारतापेक्षा मागे कसे? तिथे तर जास्त दंगे/जातीयवाद होतो इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जो देश/राज्य जास्त क्राईम विरुद्ध आवाज उठवतो पोलिसात तक्रार करतो त्याचा “क्राईम रेट” जास्त आहे,”क्राईम रेट” म्हणजे तक्रार किती नोंदविल्या याचा आराखडा आहे, म्हणजे सांगायचे झाले तर केरळ मधील क्राईम रेट जास्त आहे,उलट तिथे साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे,याचा अर्थ तिथली जनता क्राईम विरुद्ध जास्त रिपोर्ट करते,तक्रार करते,जागरूक राहते म्हणून ती “क्राईम रोपोर्ट”बाबत पुढे आहे, पण यूपी,बिहार,सारखी राज्य “क्राईम रेट” मध्ये कमी आहेत कारण तिथे तक्रार,गुन्हे नोंदवले जातच नाहीत,त्यामुळे क्राईमचा निश्चित आकडा समजत नाही, परिणामी हेच राज्य क्राईमच्या दृष्टीने पुढारलेले आहेत,२०१७ ला इंडियन नॅशनल बार असोसिएशनने सर्व्हे केला होता,७०℅ स्त्रिया त्यांच्या लैंगिक शोषणाच्या तक्रारी करायला घाबरतात,काहींमध्ये पोलिस दबाव असतो की तक्रार करू नका म्हणून..असाच एक स्टॅटिस्टिक डेटा आहे “डावरी रिलेटेड डेथ” नॅशनल क्राईम ब्युरो च्या अनुसार भारतात ८००० स्त्रिया प्रत्येकवर्षी हुंडाबळीने मरतात.
वरील सर्व परिस्थितीला इथली नेते मंडळी आणि प्रधानमंत्री मोदी यांनी ही सहमती दर्शवली होती, पण हे सत्तेत आल्यावर ही परिस्तिथी नाकारत आहेत,२०१३ ला मोदींनी ट्विट केलं होतं की,”india is consider fourth most dangerous country for women”पण आता ते नकार देत आहेत,२०१४ ला भाजप खासदार राजीवचंद्र शेखर यांनी हि लिहिलं होतं,” i believe india deserves better being a fourth most dangerous country in the world,it’s shameful,vote for change#rajiv for NAMO, पण जसे हे सत्तेत आले तेव्हा हा सर्व्हे विकाऊ झाला/काँग्रेसी झाला/ सेक्युलर झाला/देशद्रोही झाला.
२०११ ते २०१८ हा भारताचा प्रवास गंभीर आहे,इथे बलात्काऱ्याच्या समर्थनार्थ मोर्चे निघतात,3/4 वर्षाची चिमुकली ही याला बळी पडते,खैरलांजीतील भोतमांगे सारखा बाप “मुलीला न्याय मिळेल” या प्रतीक्षेत संपून जातो,मुलींनी काय घालावे यावर धार्मिक ज्ञान दिले जाते,”सातच्या आत घरात” असा चित्रपट काढावा लागतो,संस्कृती रक्षक नावाची कीड स्त्रियांवर लक्ष ठेवूनच असते,भारत नावाच्या देशातील हिंदुस्थानाचे नियमच वेगळे..अजून तरी देश स्वतंत्र झाला नाहीये,आणखीन किती पिढ्या या स्वातंत्र्याची वाट पाहण्यात सरणावर झोपणार आहेत कोणास ठाऊक?
