पालघर,दि.07:-डहाणू तालुक्यातील धाकटी डहाणू येथे दि.6 मे,2025 रोजी झालेल्या वादळामुळे 40 ते 50 बोटी व 10 ते 12 घरांचे नुकसान झाले असून जिल्हाधिकारी डॉ.इंदू राणी जाखड यांच्या निर्देशानुसार व मार्गदर्शनानुसार उपजिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी,डहाणू महेश सागर, दिनेश पाटील, उपआयुक्त मत्स्यव्यवसाय विभाग व डहाणू तालुक्याचे तहसिलदार सुनिल कोळी यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला व नुकसान झालेल्या मच्छिमार बांधवांची भेट घेऊन त्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
तसेच उपजिल्हाधिकारी व उपविभगीय अधिकारी,डहाणू महेश सागर यांनी शासनातर्फे नियमानुसार योग्यती मदत देण्यात येईल असे नुकसानग्रस्त बांधवांना सांगितले. संबंधित नुकसानीचे पंचनामे सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय विभाग व महसूल प्रशासनाचे कर्मचारी यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed