वसई (प्रतिनिधी)- वसई विरार महापालिकेच्या घनकचरा विभागात महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आपसात संगनमताने कचऱ्याचा ठेका घेणाऱ्या ठेकेदारांनी मुकादम आणि वाहन चालकांच्या नावाने लाखोंची बिले उकळण्याचा प्रकार ताजा आहे.यासह सदर प्रकरणी कारवाई टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असून एकमेकांवर चाल ढकलपणा करत असल्याचेही समोर आले आहे.तर या सर्व प्रकरणामुळे महापालिकेत सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल समाजसेविका तथा पत्रकार रुबिना मुल्ला यांनी उघड केली असून आगामी काळात अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांसह ठेकेदारांवर चाप लावण्यासाठी महापालिका आयुक्त कश्या प्रकारे भूमिका घेणार,याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.तर महापालिकेची प्रतिमा मलीन करणाऱ्या अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांसह ठेकेदारांना शिस्त लावण्यासाठी रुबिना मुल्ला यांनी मार्गदर्शन सूचना सुचवल्या आहेत.त्या पुढील प्रमाणे

1) बायोमेट्रिक हजेरी चालू करा…
2) घणकचरा च्या निघणाऱ्या बिलावर ठेका आरोग्य निरीक्षकाची स्वक्षारी बंद करा..
3) घणकचरा च्या अधिकारीच्या कॅबिन मधील सिसिटीव्ही फुटेज पडताळणी व्हावी,जेणेकरून हे आपल्याला कळेल की ठेकेदार, मनपा अधिकारी किती वेळ बसतात आणि जनता ताटकळतं उभी राहते..
4) घणकचरा विभागातील कर्मचारी यांच्या गळ्यात आयडी अनिवार्य करा…
5) कोरोना काळ ते आता पर्यंत बायोमॅट्रिक द्वारे सर्व मजुरांची हजेरीची चौकशी करा..
6) कोरोना काळा पासून बायोमॅट्रिक बंद आहे प्रथमतः ते सुरु करण्यात यावे…
7) घणकचरा विभागतील 3 वर्ष पूर्ण झालेल्या अधिकारी यांची तात्काळ बदली करण्यात यावी जेणेकरून भ्रष्टाचारला आळा बसेल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *