
वसई प्रतिनिधी : गौतम नगर गास (निर्मळ) रहिवासी संघातर्फे दिनांक 20 मे 2025 रोजी दहावी व बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला गौतम नगर मधील अनेक विद्यार्थी चांगल्या टक्केवारीमध्ये उत्तीर्ण झाल्यामुळे गौतम नगर गास (निर्मळ) रहिवासी संघातर्फे त्यांना गौरव चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमात गौतम नगरचे अध्यक्ष मंगेश क.मोहिते, खजिनदार अँड. राकेश चं. चव्हाण, सेक्रेटरी हरेश ग.मोहिते (पत्रकार) नितीन ज.मोहिते (सांस्कृतिक कला-क्रीडा विभाग) कुणाल ग. मोहिते (पर्यटन विभाग) यशवंत न.चव्हाण, निलेश क. मोहिते, वरिष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत सखाराम चव्हाण, नरेश तांबे, रघुनाथ मोहिते, आणि विशेष उपस्थितीमध्ये समाजसेवक श्री.सन्नी डिसोजा असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी पार करण्यामागे गौतम नगर मधील शिक्षण विभाग प्रमुख मनोज मोहिते व खजिनदार अँड. राकेश चव्हाण यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.