दिव्यांगाना शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन मेडिकल प्रमाणपत्र सक्तीचे केले असल्यामुळे तसेच ते प्रमाणपत्र मिळवण्यासाठी दिव्यांगाना विरार शासकीय ग्रामीण रुग्णालयात तारेवरची मोठी कसरत करून हेळसांड होत आहे.तसेच प्रमाणपत्रासाठी सकाळी 7 वाजल्यापासून दिवसभर दिव्यांगाना थांबावे लागत आहे एकतर दिव्यांगाना पिण्याच्या पाण्याची ही व्यवस्था नसून त्याच रुग्णालयात दिव्यांगांच्या सर्व प्रवर्गातून जसे अंध,अस्थिव्यंग ,कर्णबधिर ,मूकबधिर , मतिमंद अशांना ऑनलाईन प्रमाणपत्र वितरित न करता केवळ अस्थिव्यंग दिव्यांगानाच आणि ते ही दिरंगाई ने वितरित केले जात आहे.हा इतर दिव्यांगांवर अन्यायच आहे.तसेच दिरंगाई होत असलेल्या ऑनलाईन प्रमाणपत्रांमुळे दिव्यांग हा शासनाच्या विविध योजना पासून वंचित राहत आहे. विरार शासकीय ग्रामीण रुग्णालयात सर्व दिव्यांग प्रवर्ग निहाय आणि विनाविलंब ऑनलाईन प्रमाणपत्र मिळण्याची व्यवस्था करावी.
अशी मागणी अपंग जनशक्ती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा दिव्यांग राखीव 3% निधी नियंत्रण समिती चे पालघर जिल्हा सदस्य देविदास जयवंत केंगार यांनी मंत्रालय तील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे आपले सरकार ह्या पोर्टल द्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *