मुंबई / अकोला (५ जुलै २०२५) :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची अधिकृत वकील संघटना शिव विधी व न्याय सेना या संघटनेच्या अमरावती विभागीय अध्यक्षपदी अकोला येथील सत्र न्यायालयात वकिली व्यवसाय करत असलेले ऍड. महेश गजानन शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या महत्त्वपूर्ण नियुक्तीचा समारंभ शिवसेना भवन, मुंबई येथे पार पडला. पक्षाचे ज्येष्ठ नेते व शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांच्या उपस्थितीत आणि शिव विधी व न्याय सेनेचे राज्याध्यक्ष ऍड. नितेश सोनावणे यांच्या हस्ते ऍड. शिंदे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

या कार्यक्रमास राज्य प्रभारी उपाध्यक्ष ऍड. स्वप्ना कोदे, राज्य चिटणीस ऍड. सुमित घाग, राज्य कार्यकारिणी सदस्य तथा विदर्भ समन्वयक ऍड. गिरीश दिवाणजी, मराठवाडा सचिव ऍड. भक्ती दांडेकर, युवासेना अकोला जिल्हाप्रमुख सागर रामेकर, तसेच शिवसेना उपतालुकाप्रमुख पवन अरुण तायडे हे उपस्थित होते.

नवीन नियुक्तीनंतर ऍड. महेश शिंदे यांनी विभागातील (यवतमाळ, अकोला, अमरावती, वाशीम, बुलढाणा) वकिलांची सशक्त टीम तयार करून गरजू व गोरगरीब जनतेसाठी मोफत कायदेशीर सल्ला केंद्र स्थापन करण्याचा संकल्प केला आहे. शिवसेनेच्या “२० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण” या ब्रीदवाक्याला अनुसरून लोकहितार्थ कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

राज्याध्यक्ष ऍड. नितेश सोनावणे यांनी यावेळी ऍड. शिंदे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *