नालासोपारा | दि. 18 जुलै 2025
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आ. जितेंद्र आव्हाड यांच्यावर काल रात्री करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ आज नालासोपाऱ्यात जोरदार आंदोलन करण्यात आलं. या घटनेचा लोकशाहीवरील हल्ला म्हणून तीव्र निषेध करण्यात आला.

या आंदोलनाचं नेतृत्व जिल्हासरचिटणीस व सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रोहित रमेश ससाणे यांनी केलं. आंदोलनात शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी रस्त्यावर उतरले होते. “हल्लेखोरांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे”, अशी मागणी घोषणांच्या माध्यमातून करण्यात आली.

प्रमुख उपस्थित मान्यवर: विजय नागवेकर (जिल्हा उपाध्यक्ष), विनायक खर्डे (जिल्हा उपाध्यक्ष), सोहेल शेख (जिल्हा पदाधिकारी), राजू यादव (जिल्हा सचिव), चंद्रकांत कदम (नालासोपारा विधानसभा अध्यक्ष), योगेश पंदेरे (युवक अध्यक्ष), शिवाजी पाटील (ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष), धर्मराज व्हटकर (सहकार सेल जिल्हाध्यक्ष), अनिल वाघेला (कामगार सेल अध्यक्ष), श्रीधर पाटील (युवक कार्याध्यक्ष), अब्दुला खान, अज्जू खान आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी बोलताना रोहित ससाणे म्हणाले:
“हा हल्ला केवळ जितेंद्र आव्हाड यांच्यावर नव्हे, तर लोकशाहीच्या मूल्यांवर आहे. अशा घटना खपवून घेतल्या गेल्या तर सामान्य नागरिकही असुरक्षित होतील. आम्ही ठामपणे मागणी करतो की दोषींवर तात्काळ कठोर कारवाई व्हावी.”

कार्यकर्त्यांनी शांततेत, पण ठामपणे निषेध नोंदवत प्रशासनाला इशारा दिला की, राजकीय हल्लेखोरांना संरक्षण देणाऱ्यांना आम्ही माफ करणार नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्पष्ट इशारा:
“नेत्यांवर होणारे हल्ले सहन केले जाणार नाहीत, आणि न्याय मिळेपर्यंत संघर्ष थांबणार नाही”, अशी भूमिका आंदोलनातून अधोरेखित करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *