
मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी
सारंग मित्र मंडळ आणि अपंग जनशक्ती संस्था यांच्या वतीने वसई पूर्व येथील तारकेनगर या गावातील बालवाडीत मधील 40 लहान मुलांना पाटी व पेन्सिल देण्यात आल्या.तसेच तारकेनगर , सातीवली , तुंगार फाटा येथील जिल्हा परिषद शाळेतील प्रत्येक वर्गाला प्रत्येकी एक एक घड्याळ वाटप करण्यात आले.
ह्यावेळी सारंग मित्र मंडळ चे अध्यक्ष राहुल आत्माराम घरत , अपंग जनशक्ती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देविदास जयवंत केंगार , जनसेवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष विजय सरदार ,विदर्भ युवा संघटनेचे आश्विन सावरकर,आई गावदेवी गोविंद पथकाचे अध्यक्ष नीलेश कुवरा व पथकाचे कार्यकर्ते ,सारंग मित्र मंडळ चे अनिल लालजी गुप्ता , एवन सिंह,रणजित सिंग राणावत ,अपंग जनशक्ती संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे, निलेश भुताव ,आकाश कांबळे ,समीर अन्सारी,रोशन पवार, तारकेनगर चे रहिवाशी तसेच शाळेतील शिक्षक उपस्थित होते.
सारंग मित्र मंडळ चे अध्यक्ष राहुल आत्माराम घरत , अपंग जनशक्ती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देविदास जयवंत केंगार तसेच उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे शाळेतील शिक्षकांनी राहुल घरत आणि देविदास जयवंत केंगार हे शाळेतील मुलांना सतत शाळेउपयोगी साहित्य देत असल्याने शाळेतील शिक्षकांनी यांचे आभार मानले.
