
कोल्हापूर, सातारा, व सांगली या जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली असल्याने केंद्र शासनाने राष्ट्रीय आपत्ती घोषित करून पुर स्थितीतील सर्व नागरिकांसाठी जेवण पाणी वैद्यकिय सुविधा, शेतकऱ्यांचे पूर्ण कर्ज माफ , पुरात वाहून गेलेल्या लोकांचे घर बांधणी व इतर सर्व सुविधा शासनाने तात्काळ पुरविण्यात यावी अशी मागणी शमशुद्दीन खान यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व केंद्रीय ग्रूहमंत्री अमितजी शाह यांच्याकडे दि.12/08/2019 रोजी केली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने व सांगली आणि कोल्हापूरमधील पुरस्थिती अतिशय गंभीर असल्याने केंद्र शासनाने वरील प्रकरणी तात्काळ आर्थिक मदत महाराष्ट्राला देणे गरजेचे आहे.सदर ठिकाणी बचाव कार्यासाठी पंजाब, गोवा, गुजरातमधून मागवण्यात आलेल्या अतिरिक्त पथकांच्या माध्यमातून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. एनडीआरएफ, लष्कर, हवाई दलाच्या मदतीने पूरग्रस्तांना एअरलिफ्टने बाहेर काढण्यात येत आहे. १८ गावांना पुराचा वेढा पडला असून या पुरामुळे २८ हजार लोक बाधित झाले आहेत. या पुरामुळे कोल्हापुरात चौघांचा मृत्यू झाला आहे. पुरामुळे ६७ हजार हेक्टर जमिनीवरील पीकं नष्ट झाली असून ऊसालाही धोका निर्माण झालेला आहे. सांगलीत परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने केंद्र शासनाने राष्ट्रीय आपत्ती घोषित करणे गरजेचे आहे व पुर स्थितीतील नागरिकांना मदत करण्याकरता महाराष्ट्राला आर्थिक मदत करणेकामी केंद्र शासनाने लवकरच योग्य पाऊल उचलणे गरजेचे आहे.केंद्र शासनाने तात्काळ राष्ट्रीय आपत्ती घोषित करून महाराष्ट्र राज्याला आर्थिक मदत करावी “अभी नही तो कभी नही” असेही शमशुद्दीन खान यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.
