
आज १५ऑगस्ट २०१९ रोजी स्वातंत्र दिनी मी वसईकर अभियानाच्या वतीनं रक्त क्रांती अभियान वसईत राबविण्यात आलं.वसई डी वाय एस पी ऑफिसच्या प्राणांगणात राष्ट्रध्वजाला सलामी देऊन व राष्ट्र गीत गाऊन करण्याचं निश्चित केले होते. परंतु प्रणांगणाच्या तोंडावर कडक बंदोबस्त ठेवला होता.त्यामुळे सुमारे अडीचशे फुटाच्या पलीकडे रस्त्यावरून नागरिकांना राष्ट्र ध्वजास सलामी देऊन राष्ट्रगीत म्हणावे लागले.
स्वातंत्र मिळून ७२ वर्ष लोटली, देश प्रजासत्ताक होऊन ,देशात जनतेची सत्ता असताना देखील वसईतील प्रशासन हे लोकाभिमुख नसून ते आपण मालक आहोत, राजा आहोत अशा पद्धतीने वागत आहे.गेले तीस पसतिसवर्षं वसईकर जनतेला न्यायचं मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे.करदात्यांच्या सुमारे ११ कोटी रुपयांचा चुराडा/अपव्यय होऊन सुद्धा साधा एफ आय आर दाखल होऊ शकत नाही.त्या मागणिकरिता जनतेला आंदोलने करावी लागत आहेत.
स्वातंत्रवीर व क्रांतिकारक यांनी सांडलेले रक्त हे स्वकीय प्रशासनाने स्वकीय जनतेवर अन्याय करण्यासाठी नव्हते.त्यामुळे प्रशासनाकडून सर्वसामान्य वसईकरना प्रत्येकबाबतीत न्याय मिळाला पाहिजे ह्या वसईकरांच्या अतिशय तीव्र भावना आहेत.त्या भावना रक्तदानाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आल्या.स्वखुषीने कायदाप्रेमी ९० पेक्ष्या जास्त नगरिकांनी प्रत्येकी ५ एमल रक्ताच्या बाटल्या मा.तहसिलदार वसई यांच्या कडे त्यांच्या दालनात शितपेटीत बंद करून विनंती पत्रासोबत मा.मुख्यमंत्री याना पोंहचविण्यासाठी सुपूर्द करण्यात आल्या.
कार्यक्रमात मी वसईकर अभियानाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व असंख्य कायदप्रेमी नागरिकांसह डॉमणिका डाबरे, नगरसेविका किरण चेंदवणकर, शेखर धुरी व अनेक मान्यवर उपस्थित होते.अभियान अतिशय शांततापूर्ण व भावणापूर्ण वातावरणात संपन्न झाले.
