32 दिवसापासुन एडवोकेट अशोक वर्मा,एडवोकेट अनिल चव्हाण,पत्रकार किसनदेव गुप्ता व अनेक कायदाप्रेमी नागरिक हे वसई सनसिटी मधील सर्वधर्मीय दफनभूमिच्या निर्माणकार्यात झालेल्या सुमारे 11 कोटी रुपयांच्या जनतेच्या पैशांचा अपव्यय कारणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे हया मागणीसाठी धरने आंदोलन करीत आहेत.तसेच तहसीलदार कार्यालयाबाहेर 5 ऑगस्ट पासुन कार्यकर्त्यांचे धरने आंदोलन सुरु होते .परंतु इतके दिवस होउनसुद्धा प्रशासनाचे व पालघर जिल्हा पोलिसांचे डोळे उघडले नाहीत.पालघर पोलिस गुन्हा दाखल करत नसल्यामुळे मी वसईकर अभियानाचे कार्यकर्ते व आंदोलनकारी ह्यांनी पालघर पोलिसांना दैवत मानुन त्यांची आरती सुरु केली, त्यांची पालखी काढली, तरीसुद्धा पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही .याउलट आंदोलनकांवरच माणिकपुर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कांबळे ह्यांनी खोटे गुन्हे दाखल केले व आंदोलनकरींना अपमानास्पद वागणूक देऊन पोलिस ठाण्याबहेर हाकलून लावले.15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी आम्ही सर्वांनी मिळून रक्तक्रांति अभियान dysp ऑफिस बाहेर केले.त्यात सुद्धा पोलिसांनी आमची परवानगी नाकारली होती त्याशिवाय आम्हाला dysp ऑफिस च्या प्राणांगणात झेंड्याला सलामी सुद्धा देण्यापासून रोखण्यात आले.आम्ही रक्तक्रांति अभियानद्वारे सुमारे 90 रक्ताच्या बाटल्या जनतेच्या भावनांच्या स्वरूपात तहसीलदारांमार्फत मा. मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्या. दिनांक 16 ऑगस्ट रोजी तहसीलदारांच्या आश्वासनाच्या पत्राच्या आधारे तहसीलदार ऑफिस समोरील आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.तसेच हे आंदोलन आता मी वसईकर अभियानाच्या माध्यमातून जनतेमधे घेऊन जात आहोत . शनिवार दिनांक 17ऑगस्ट पासुन जनतेमधे जाऊन त्यांना ह्या आंदोलनात सामिल होण्याचे आव्हान करुन सोबत 11 कोटीच्या भ्रष्टाचाराबाबत जन-संवादातून जनजागृतीचे कार्य करण्यात येणार आहे.तसेच आपले सहकारी त्यांचे धरणे आंदोलन सुरुच ठेवणार आहेत.
आपण सर्वांनी मिळून जनतेच्या पैशांचा अपव्यय करणाऱ्या भ्रष्टाचार्यांना जेल मधे पाठवून आपले 11 कोटि वसूल करुया, तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या व्यवस्थेला लोकशाही मार्गाने कायद्याचे व जनतेचे लोकशाही मधील महत्व लक्षात आणून देऊया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *