वसई-विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक मालक महासंघ (रजि.) यांनी बहुजन विकास आघाडीला अधिकृत जाहीर पाठिंबा दिला आहे.
महासंघाचे अध्यक्ष श्री. महेश यांच्या स्वाक्षरीने बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष मा. ना. हितेंद्र ठाकूर यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात हा पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. वसई-विरार शहरातील रिक्षा, टॅक्सी चालक व मालकांच्या विविध प्रश्नांसाठी बहुजन विकास आघाडीने सातत्याने आवाज उठवला असून प्रशासनाकडून न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावी भूमिका घेतल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
कोरोना महामारीच्या कठीण काळात रिक्षा चालकांवर आलेल्या आर्थिक संकटात बहुजन विकास आघाडीने शासनदरबारी पाठपुरावा करून मदतीसाठी प्रयत्न केल्यामुळे हजारो वाहनचालकांना दिलासा मिळाल्याचे महासंघाने स्पष्ट केले आहे.
लोकशाहीच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर बहुजन विकास आघाडीच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत, शहरातील सर्व उमेदवारांना संघटनेचा पूर्ण पाठिंबा राहील, असेही महासंघाने जाहीर केले आहे. वसई-विरार शहराच्या सर्वांगीण, न्याय्य व लोकाभिमुख विकासासाठी बहुजन विकास आघाडीच्या सोबत खंबीरपणे उभे राहणार असल्याचा निर्धारही या पत्रातून व्यक्त करण्यात आला आहे.
या जाहीर पाठिंब्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या प्रचाराला अधिक बळ मिळणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *