
प्रतिनिधी : रविवार दिनांक १८ आँगस्ट २०१९ रोजी सिध्दार्थ नगर (वसई पश्चिम) येथील रहिवासी प्रकाश भोईर यांच्या परिवाराने त्यांच्या आईच्या स्मृतीस उजाळा देण्यासाठी वसई पश्चिम विभागातून सक्रीय कार्यरत असलेली भिम प्रेरणा जागृती संस्थेस भोईर परिवाराने गरीब गरजू विद्यार्थी वर्गास १०० वह्या व १०० पेन दान केले. सदर संस्थेची चालु असलेली यशस्वी वाटचाल, अनेक असे समाज उपयोगी उपक्रम आणि नवनविन संकल्पना या वसई पश्चिम विभागात असलेल्या नऊ गावात खुप चांगल्या प्रकारे राबवित आहेत. तसेच बहुजनसमाज हिताचे कार्य संस्था भविष्यात करणार आहे म्हणून प्रकाश भोईर यांनी संस्थेस मदत केली आहे. पुण्यानुमोदन कार्यक्रमात अनेक सामाजिक कार्यकर्ते सिध्दार्थ नगर मधील ग्रामस्थ व भिम प्रेरणा जागृती संस्थेचे अध्यक्ष अँड. चेतन भोईर व सल्लागार महेश जाधव, कुणाल मोहिते उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष अँड. चेतन भोईर यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले की समाज उपयोगी नवनवीन उपक्रम संस्था राबवत आहे पण सध्या दोन उपक्रम लोकांना खुपच आवडत आहेत ते म्हणजे पहिला उपक्रम वाढदिवसानिमित्त वहया व पेन देने सदर उपक्रमात दोन ते तीन महिण्याभरात अनेक लोकानी गरीब-गरजू विद्यार्थी वर्गास वहया दान केल्या आहेत आणि करत आहेत खुपच चांगला प्रतीसाद आहे आणि दुसरा उपक्रम म्हणजे कोणी रूग्ण आजारी असेल आणि त्याची परिस्थिती हालाकीची असेल तर त्यांना सुध्दा आर्थिक मदतीचे आव्हान केले हया दोन्ही उपक्रमास भरभरून प्रतिसाद मिळत आहे मिळत असलेल्या प्रतिसादामुळे अध्यक्ष म्हणून अँड. चेतन भोईर यांनी सर्वाचे आभार मानले.
