दि.१९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त वसई विरार शहर महानगरपालिकेमार्फत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. महानगरपालिका मुख्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीस मा.महापौर श्री.अजीव पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच यावेळी उपस्थित मा.उप-महापौर श्री.मार्शल लोपीस, मा.आयुक्त श्री.मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.), मा.अतिरिक्त आयुक्त श्री.संजय हेरवाडे तसेच उपस्थित मा.नगरसेवक, मा.नगरसेविका, महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन इतिहासाविषयी, महाराजांच्या शौर्याविषयी, पराक्रमाविषयी तसेच शिवजयंती विषयीच्या माहितीचे वाचन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’ चा निनाद करून महाराजांना मानाचा मुजरा केला. उपस्थितांनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषामुळे संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *