
प्रतिनिधी : भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७२ व्या वर्धापनदिन समारंभ दि.१५ ऑगस्ट २०१९ रोजी दीपस्तंभ प्रतिष्ठान, वसई या संस्थेने भिवंडी तालुक्यातील खारबाव जवळच्या बंगलापाडा (मिलोडी) येथिल जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यां, शिक्षक स्थानिक ग्रामस्थ यांच्या सोबत मोठ्या हर्ष उल्हासात साजरा केला. या वेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढुन गावातील व परीसराचे वातावरण देशभक्तीपर गिते व घोषणांनी भारावून टाकले. प्रभात फेरी नंतर झेंडा वंदन झाले. शाळेच्या मुख्याध्यपक,मान्यवरांनी,विद्यार्थीसंस्थेचे सचिव यांनी उपस्थितांचे स्वागत करून सर्वांना भारतीय स्वातंत्र्यदिनाचा शुभेच्छा दिल्या विद्यार्थी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी उपस्थितांना मिष्टान्न व शितपेय दिले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपापली भाषणे सादर केली,देशभक्तीपर गिते सादर केली. या नंतर सर्व विद्यार्थींना गणवेश, शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्ष सिध्दार्थ बाविस्कर यांनी वैयक्तिक स्वच्छतेचे महत्व विद्यार्थ्यांना समजावले व संस्थेमार्फत साबण, टूथ पेस्ट, टुथब्रश वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.राजु वाघमारे व ईतर शिक्षकांनी भरपुर मेहनत घेतली. सोबत बळीराम तांबडे, भगवान चौधरी, सौ.रत्ना तांबडे, राम भोईर, कविता पाटील, मिना जाधव, कमला जाधव, जयश्री सोनवणे, प्रवीण गायकर, रेखा वतारी,हितेंद्र जाधव, प्रकाश भोईर, अलका जाधव या स्थानिकांच्या सोबत जिजाऊ संस्था-झडपोली(विक्रमगड ),राजे गृप मालोडी-खारबाव यांचे सहकार्य लाभले. समारंभाच्या यशस्वीतेसाठी दिपस्तंभ प्रतिष्ठान, वसई या संस्थेचे सिध्दार्थ बाविस्कर, निलेश दळवी, कविता दळवी, बारकु काटेला,हाल्या धाडगा,जागृती बोलके, महेश बोलके, रवी अंधेर, निलेश कदम, बाळकृष्ण इंगळे, गौरव जाधव, शैलेश मोहीते यांनी मेहनत घेतली. वसईतील अशोक राऊत, गिता राऊत, विकास जाधव, कीशोर जाधव, अजित मोहीते,गोविंद भोईर, चार्ल्स फर्नांडिस , जाॅयल डाबरे,गुप्ता कीराणा स्टोअर वाघोली(निर्मळ)यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ग्रामस्थ, शिक्षक यांनी दीपस्तंभ प्रतिष्ठान, वसई या संस्थेच्या सर्व सदस्यांचे आभार मानले व या पुढेही असेच सहकार्य, सहभाग द्यावा अशी अपेक्षा केली.
