

सांगली , कोल्हापूर ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुर येऊन अनेक कुटुंब बेघर झाले आहे.पूरग्रस्त कुटुंबियां च्या घरात 5 फूट वर पाणी आल्याने घरातल्या अनेक जीवनावश्यक वस्तू कपडे , धान्य पुरामध्ये वाहून गेली आहे. सांगली , कोल्हापूर येतील कुटुंब मोल मजुरी करून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवणाऱ्या कुटुंबावर गेल्या पावसाच्या पुराचा फटका बसला आहे.
त्यांना मदत करण्यासाठी अपंग जनशक्ती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देविदास जयवंत केंगार तसेच संस्थेचे पदाधिकारी यांनी मदत फेरी केली होती .अपंग जनशक्ती संस्था यांच्या प्रतिसादाला साथ देवून सारंग मित्र मंडळ चे अध्यक्ष राहुल आत्माराम घरत , गोल्डन युवा फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष किरण बनसोडे ,स्थानिक सातीवली रिक्षा स्टँड चे नवनाथ जयवंत केंगार तसेच सातीवली रिक्षाचे सहकारी, जनसेवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष विजय सरदार , ब्रॅण्डन चिंचक तसेच दीव्यांगानी धान्य, बिस्कीट, गहू ,कपडे, तांदुळ , तेल,साबण अश्या जीवनावश्यक वस्तूंची मदत सांगली,कोल्हापूर येथील पूरग्रस्त कुटुंबीयांना मदतीचा हात पुढे केला आहे.