आगाशी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि दक्ष नागरिक पालघर जिल्हा समितीचे संस्थापक अनिकेत वाडिवकर पोलीस अधीक्षकांतर्फे आपले म्हणणे सादर करणार ?

राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण नरिमन पॉइंट येथे पालघर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्री गौरव सिंग आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री हितेंद्र विचारे यांच्याविरोधात नालासोपारा येथील तथाकथित व्हिसल ब्लोअर निमीष बसा या आरटीआय कार्यकर्त्यांने साल २०१८ मध्ये तक्रार याचिका दाखल केली होती. सदरच्या याचिकेमध्ये निमीष बसा यांनी दिनांक १५ जुलै २०१९ रोजी अतिरिक्त खुलासा सादर करून त्यामध्ये वसई तालुक्याचे अपर पोलीस अधीक्षक श्री. विजयकांत सागर आणि स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. जितेंद्र वनकोटी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

सदरच्या अतिरिक्त खुलाश्या मध्ये श्री अनिकेत वाडिवकर यांच्यावर देखील निमीष बसा यांनी गंभीर आरोप केले होते. सदर आरोपांचे खंडन करण्यासाठी आणि निमिष बसा यांनी दाखल केलेल्या याचिका प्रकरणी सत्य परिस्थिती प्राधिकरणासमोर मांडण्यासाठी दिनांक १९ ऑगस्ट २०१९ रोजी अनिकेत वाडिवकर हे स्वतः प्राधिकरणासमोर हजर झाले आणि त्यांनी मा. न्यायाधीश महोदयांसमोर आपले म्हणणे सादर करण्याची परवानगी मागितली.

मात्र फौजदारी प्रक्रियां संहितेमध्ये याचिकाकर्ते अथवा प्रतिवादी यांच्या व्यतिरिक्त त्रयस्थ इसमास आपले म्हणणे सादर करायची थेट परवानगी देण्याचे प्रावधान नसल्यामुळे मा. न्यायाधीश महोदयांनी अनिकेत वाडिवकर यांना तसे सांगितले.

अनिकेत वाडिवकर यांनी सदर याचिका प्रकरणी निमीष बसा व पोलीस अधीक्षक हे आपापली बाजू मांडतीलच पण या प्रकरणातील तिसरी बाजू मी पुराव्यांसह आपल्यासमोर ठेवू इच्छितो. सदरचे पुरावे पाहिल्यानंतर निश्चितपणे या याचिकेच्या अंतिम निकालावर परिणाम होणार आहे. त्यामुळे हे पुरावे सादर करण्याची आपण मला परवानगी द्यावी. अशा प्रकारे न्यायाधीश महोदयांना विनंती केली

त्यांच्या विनंतीमधील प्रामाणिकपणा लक्षात आल्यानंतर न्यायाधीश महोदयांनी “आपल्याला या खटल्याच्या संदर्भात जर काही पुरावे सादर करायचे असतील तर ते तुम्ही पालघर पोलीस अधीक्षक यांच्याकडे देऊन त्यांच्यातर्फे न्यायालयामध्ये सादर करू शकता” अशाप्रकारे बोलून त्यांना दिलासा दिला. त्यामुळे अनिकेत वाडिवकर यांचा खुलासा व त्याबरोबर त्यांनी जोडलेले पुरावे राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण यांच्यासमोर सादर करण्याचा मार्ग खुला झाला आहे.

याबाबत अनिकेत वाडिवकर यांच्याशी संपर्क साधला असता माहिती अधिकाराचा वापर करून विनाकारण पोलिस दलाला वेठीस धरणाऱ्या तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या विरोधात आपण माहिती अधिकाराचे हत्यार उपसले असल्याचे उत्तर दिले.

अनिकेत वाडिवकर हे दक्ष नागरिक पालघर जिल्हा समितीचे संस्थापक असून भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त माहिती अधिकार संघटनेचे वसई तालुका अध्यक्षही आहेत. पोलिसांशी सहकार्य करून त्यांनी अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणले असून त्यांनी पाठपुरावा केलेल्या अनेक प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत. दाखल गुन्ह्यातील काही गुन्हेगार अटकेच्या भीतीने आजही फरारी आहेत.

सदर प्रकरणामध्ये अनिकेत वाडिवकर यांनी आपले म्हणणे सादर करू नये यासाठी विरार येथील एका राजकीय संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षाने त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अनिकेत वाडिवकर यांनी या दबावाला भीक घातली नाही.

निमिष बसा हा इसम नालासोपारा उमराळे गावात स्वस्तिक कन्सल्टन्सी ह्या नावाने कायदेशीर सल्ला देण्याचे तसेच सहकारी गृहनिर्माण सोसायटी विषयक कामे करण्याचे काम करत असून निमिष बसा यांनी मुंबई उच्च न्यायालय येथे महाराष्ट्र गृहनिर्माण विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाच्या विरोधात साल २०१४ मध्ये जनहित याचिका (क्र.४३/२०१४) दाखल केली होती. सदर याचीके प्रकरणी सुरुवातीची चार वर्षे नियमित तारखा पडत होत्या. मात्र २०१८ मध्ये या याचिका प्रकरणात संपूर्ण वर्षात एकच तारीख पडल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचप्रमाणे निमिष बसा यांचे जनता दल सेक्युलर मधले सहकारी श्री प्रसाद धोंडे यांनी साल २०१२ मध्ये भटक्या विमुक्त जमाती करिता घरे मिळवून देण्यासाठी जनहित याचिका (१७/२०१२) दाखल केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed