वसई:- दिवसेंदिवस RTI कार्यकर्ते जनतेस डोकेदुखी ठरू लागले आहेत, आज स्थानिक राहिवासीच्या अधिकृत मालमत्ता क्रमांक फक्त पडके घर अस्तित्वात नसल्याचे कारण देऊन त्यास रद्द करवून त्यास बेघर करण्या पर्यंत RTI कार्यकर्ते व वसई विरार शहर महानगरपालिकेची मजल गेली आहे.

पालिकेच्या प्रभाग “आय” मधील वार्ड क्रं १११ मधील मालमत्ता क्र. ६७८ मागील 30 वर्षा पासून अस्तित्वात होती, परंतु मागील ४ वर्षा आधी पावसाळ्यात संपूर्ण घर कोसळून नष्ट झाले मालमत्ता धारक परदेशात नोकरीस असल्याने त्यास घर बांधणे कामे लक्ष देता आले नाही, सदर बाब RTI कार्यकर्त्यांना माहिती मिळताच त्यांनी सदर बाबतीत मालमत्ता धारक परदेशात असल्याचा फायदा घेत मालमत्ता जागेवर अस्तित्वात नसल्याने रद्द करण्याचा अर्ज दाखल केला व पालिके मार्फत मालमत्ता धारकास नोटीस बजावण्यात अली. वेळेवर मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ता धारकाने सविस्तर उत्तर त्यास दिले परंतु पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दबाव टाकून मालमत्ता क्र रद्द करण्या बाबत नाहरकत असल्याच पत्र देण्यासाठी दडपण आणल्याने मालमत्ता धारकाने शेवटी कंटाळून त्यास नाहरकत दिली असता पालिकेने त्यावर त्वरित निर्णय घेऊन मालमत्ता क्र रद्द केला आणि एका स्थानिकास बेघर केले.

आज रोजी मालमत्ता धारकास स्वतःचे घर नाही, नवीन घर बांधणीसाठी पालिकेच्या नवीन अटी पूर्तता करू शकत नाही, आता बेघरांना घर देणारी पालिका आणि सत्ताधारी बहुजन विकास आघाडी पीडितास त्याचा जुना मालमत्ता क्र पुन्हा पुनर्स्थापित करून त्याची निवाऱ्याची व्यवस्था करणार का?

बहुजन विकास हाच प्रगतीचा प्रकाश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *