
रविवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी
लायन्स क्लब ऑफ वसई युनिक आणि श्री साई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल डॉ. पद्मराज पाटील यांच्या सहकार्याने सागर महांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आरोग्य सभापती सलीम मेमन यांच्या सहकार्याने आरोग्य शिबिर सागर माहांबरे निवास समोर , मुस्सागल्ली , तलाव जवळ , वसई पश्चिम या ठिकाणी हार्ट चेक अप , ब्लड प्रेशर , ईसीजी , सर्व साधारण तपासणी थंडी , ताप , सर्दी ,खोकला , डायबिटीस चेक अप रक्त तपासणी तसेच डॉ. नौशीन मेमन यांच्या तर्फे फिजिओ थेरपिस्ट चे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.ह्या शिबिराचा शेकडो हून अधिक नागरिकांनी ह्या शिबिराचा लाभ घेतला.
ह्या शिबिराचे उद्घाटन वसई विरार महानगरपालिकेचे नवनियुक्त महापौर प्रवीण शेट्टी , वसई विरार नगरपरिषद चे नगराध्यक्ष अरुण चोरघे, उपनगराध्यक्ष सागर महांबारे ,माजी आरोग्य सभापती सलीम मेमन,दीपक गौर,निर्मल जैन ,लायन्स क्लब ऑफ वसई युनिक चे अध्यक्ष सुरेश काळे, माजी नगरसेवक संतोष वळवईकर,लायन क्लबचे माजी अध्यक्ष अशोक शेट्टी,लायन प्रशांत घुमरे, राजेंद्र अंजारकर हस्ते उद्घाटन करण्यात आले.
अपंग जनशक्ती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा लायन्स क्लब ऑफ वसई युनिक चे सदस्य लायन देविदास जयवंत केंगार यांच्या हस्ते शिबिरास आलेल्या सर्व डॉक्टरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
ह्यावेळी लायन्स क्लब ऑफ वसई युनिक चे अध्यक्ष सुरेश काळे , माजी आरोग्य सभापती तथा लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष सलीम मेमन , हनीफ पटेल, हनुमंत भोसले, श्रद्धा मोरे, अपंग जनशक्ती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा लायन्स क्लब ऑफ वसई युनिक चे सदस्य देविदास जयवंत केंगार , आश्विन सावरकर , किरण बढे ,सीमा काळे , आकाश कांबळे तसेच लायन्स क्लबचे चे सर्व सदस्य उपस्थित होते.
हे शिबिर यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी सना मेमन, सनी मोसेकर,राजेश वैद्य,यास्मिन पठाण , देवेंद्र सामंत ,सितारा,प्रकाश चपलो,प्रदीप गोली,मितेश राजांनी यांनी खूप मेहनत घेतली.ह्या शिबिरात नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
