
वसई गाव परिसरातील सागरशेत पेट्रोलपंप ते मुळगाव कडे जाणाऱ्या रस्त्याला काँग्रेसचे दिवंगत नेते स्व. मायकल फुटयार्डो यांचे नाव द्यावे अशी आग्रही मागणी वसई तालुका काँग्रेसचे अध्यक्ष राम पाटील आणि वसई विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष कुलदीप वर्तक यांनी वसई विरार महानगरपालिका महापौर प्रवीण शेट्टी आणि आयुक्त बळीराम पवार यांच्याकडे केली आहे.
स्व. मायकल फुटयार्डो यांचे वसई गाव परिसरातील विकासात असणारे योगदान मोठे आहे . तत्कालीन वसई नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, बांधकाम सभापती, यांसह अनेक मानाच्या पदांवर त्यांनी काम केले होते. वसई तालुका काँग्रेसचा क्रियाशील नेता म्हणून स्व. मायकल फुटयार्डो परिचित होते . फुटयार्डो यांनी या भागाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाच्या स्मृती चिरकाल स्मरणात राहव्या म्हणून त्यांचे कार्यालय असलेल्या सागरशेत पेट्रोलपंप ते मुळगाव या रस्त्याला स्व.मायकल फुटयार्डो यांचे नाव द्यावे अशी आग्रही मागणी काँग्रेसचे वसई तालुका अध्यक्ष राम पाटील आणि वसई विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष कुलदीप वर्तक यांनी केली आहे .
