

बहुजन विकास आघाडीचे युवा पदाधिकारी मजहर पठाण, सुनिल सिंह, माजीद पठाण, विनोद बीडलान, सन्नी बीडलान, सुभाष बीडलान, सुरेंद्र बीडलान, विजय डुलगच, बिट्टू बोल , विक्रम चावरीया, चिंताराम डुलगच, रागेन्दर , राहुल यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने बहुजन महा पार्टी चे राष्ट्रीय महासचिव शमशुद्दीन खान यांच्या उपस्थित प्रवेश केला आहे
बहुजन महा पार्टीत प्रवेश केल्यानंतर आमच्या प्रतिनिधीशी मजहर पठाण यांनी बोलताना सांगितले की, वसई विरार महानगर पालिका क्षेत्रामध्ये मी पक्ष वाढीकडे विशेष लक्ष देणार असून युवकांचे अनेक प्रश्न आहेत ते मी सोडवण्यासाठी व सर्व नागरिकांना सोबत घेवून काम करणार आहे.महानगरपालिका क्षेत्रातील अनेक योजनांमध्ये फक्त घोटाळे होत असल्याची बातमी आम्ही ऐकून आहोत आता आम्ही गप्प बसणार नसून स्थानिकांना रोजगार, व नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे.पक्ष आम्हाला जी जबाबदारी देईल ती प्रामाणिकपणे पाड पाडण्याचा प्रयत्न मी करणार असल्याचे मजहर पठाण यांनी सांगितले आहे .