

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.संदीपजी देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र नवनिर्माण वसई विरार शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष श्री.विजयजी मांडवकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज वसई विरार शहर महानगरपालिकेचे कामगार ( ठेका ) प्रभाग समिती ‘ एच ‘ यांची सर्वसाधारण सभा आज बुधवार, दिनांक २८/८/२०१९ रोजी दीनदयाल मार्केट हाँल, नवघर, वसई (पच्छिम) येथे सभा आयोजित करण्यात आली होती. या सदर सभेला कामगारांचा उत्फुर्त असा प्रतिसाद मिळाला.सदर सभेला कामगारांच्या तक्रारी व समस्या जाणून घेतल्या. कामगारांच्या तक्रारी व समस्या जाणून घेत मा.अध्यक्ष श्री.विजयजी मांडवकर यांनी कामगारांवर कोणताही अन्याय झाल्यास त्याला जश्यास तसे उत्तर देऊ व कामगारांचे वेतन , पी.एफ तसेच ईएसआयसी, बँक खाते चालू करणे, KYC इतर महत्वाच्या सोयी सुविधा कश्याप्रकारे कामगारांना मिळाल्या पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले.तसेच कोणतीही प्रशिक्षण न देता अवघड काम करण्यास ठेकेदार मार्फत मज्जाव केला जातो व मुकादम तर्फे कामगारांना उद्धट भाषेचा वापर केला जातो असे निर्दशनास आले असता यापुढे कोणत्याही ठेकेदाराने किंव्हा मुकादम याने कामगारांसोबत गैरवर्तन केल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. त्याचप्रमाणे सदर सभेच्या निमित्ताने वसई विरार शहर महानगरपालिका मा.अध्यक्ष श्री.विजयजी मांडवकर साहेब,परिवहन सेवेचे श्री.विश्राम मोण्डे, नजीर मुलानी,अमित श्रोती,मनोहर घरटकर, तसेच प्रभाग समिती ड ‘ चे सर्व कामगार प्रतिनिधी शाम केणी, भगवान पाटील, रुपेश मालवणकर, हेमंत पाटील, बबन धोंड, राजू हातवल, विकास मेहर,रमेश सोंकुसरे, रमेश बाबले, बबन धोत्रे आणि इतर पदाधिकारी व शेकडो कामगार वर्ग उपस्थित होते.